” सोमेश्वर ʼʼ च्या पॅनलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यकर्त्यांना ग्वाही नव्या-जुन्यांचा मेळ घालू
मी कोणालाही फोन करणार नाही, कोणाचाही रुसवाफुगवा काढणार नाही.
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2021/10/4d44e1a5-cd32-4bc5-8cbf-88600dc2f1b4-780x470.jpg)
” सोमेश्वर ʼʼ च्या पॅनलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यकर्त्यांना ग्वाही नव्या-जुन्यांचा मेळ घालू
मी कोणालाही फोन करणार नाही, कोणाचाही रुसवाफुगवा काढणार नाही.
बारामती वार्तापत्र
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत इच्छुकांची मोठी संख्या असली, तरी जागा मात्र २१ आहेत. त्यामुळे सगळ्यांना सामावून घेणे शक्य नाही.
ज्यांना कारखान्यात संधी मिळणार नाही, त्यांना इतरत्र सामावून घेतले जाईल. उमेदवारी देताना नव्या- जुन्यांचा मेळ घातला जाईल, अशी
ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शेजारील कर्मयोगी कारखान्याने – २१०० रुपये भाव दिला असताना तो बिनविरोध होतो. ‘सोमेश्वर’ने ३१०० – रुपये भाव दिला असताना निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रविवारी (दि.३)
पॅनेल जाहीर केला जाईल, अशी घोषणा – त्यांनी केली.
कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आ. संजय जगताप, ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
पवारम्हणाले की,ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अर्ज मागे घ्यावेत. मी कोणालाही फोन करणार नाही, कोणाचाही रुसवाफुगवा काढणार नाही.
हे काही माझ्या घरचे लग्न नाही.
प्रपंचाशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे रुसवाफुगवा सोडून एकदिलाने काम करीत एकतर्फी निवडणूक करा. ज्यांना
कारखान्यात संधी मिळणार नाही त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीसह अन्य सहकारी संस्थांवर संधी दिली जाईल.
मला झोप तरी येत असेल का?
चुकीच्या विस्तारवाढीमुळे ‘माळेगाव’चे वाटोळे झाले. ‘सोमेश्वर’च्या तुलनेत टनाला ३५० रुपयांचा फरक पडला. ‘छत्रपती’ला तर ‘सोमेश्वर’च्या तुलनेत ७०० रुपये कमी दर मिळाला. माझा स्वतःचा ऊस’छत्रपती’ला जातो. माझा ४ हजार टन ऊस जात असेल तर माझे किती पैसे बुडाले. किती नुकसान झाले, त्यामुळे मला झोप तरी येत असेल का? असे पवार म्हणताच हास्याचा फवारा उडाला.
मग ‘शॉक’ बसेल
उमेदवारी मिळाली नाही म्हणून
काही बाळं कधी काय करतील, हे सांगता येत नाही. गावनिहाय मतदानाची आकडेवारी माझ्याकडे येईल. ज्या गावात झटका बसेल तेथे
माझ्याकडून कसा ‘शॉक’ बसेल, हे नंतर कळेल, असे अजित पवार म्हणाले. आमच्या नेतृत्वाखालील कारखान्यात काही चुकीचे घडत असेल, तर मी जाब विचारू शकतो.इतर ठिकाणी तशी परिस्थिती आहे का,असा सवाल पवार यांनी केला.अजून खोलात गेलो नाही
माझ्यासमोर पॅनेल टाकणाऱ्यांनी मार्केट कमिटीत काय दिवे लावलेत, याच्या खोलात अजून मी गेलो नाही, अशी खोचक टिप्पणी करीत पवार म्हणाले की, विरोधी पॅनेलकडूनही मला संपर्क केला जातो आहे. परंतु,इथे माझ्याच पॅनेलमध्ये २१ जणांना सामावून घेणे अशक्य झाले असताना त्यांच्या मागणीचा विचार कितपत करता येईल, हे पाहावे लागेल.
सुपा परगण्यातील ऊस पाण्याअभावी जळत असताना ही मंडळी त्यांच्या नेत्यांकडे ऊस न्या म्हणून सांगायला गेली नाहीत. कमी रिकव्हरीचा ऊस आम्ही दौंड शुगरला देत शेतकऱ्यांना मदत केली.