सोमेश्वर विकास पॅनलकडून निंबुत-खंडाळा गटातील राष्ट्रवादीपुरस्कृत तीनही उमेदवार विजयी!
चार तालुक्यातील २० हजार ७९२ मतदारांपैकी जवळपास ९० टक्के मतदारांनी त्यांच्या आवाहनास उदंड प्रतिसाद देत मतदान केल्याचे दिसून येत आहे.
सोमेश्वर विकास पॅनलकडून निंबुत-खंडाळा गटातील राष्ट्रवादीपुरस्कृत तीनही उमेदवार विजयी!
चार तालुक्यातील २० हजार ७९२ मतदारांपैकी जवळपास ९० टक्के मतदारांनी त्यांच्या आवाहनास उदंड प्रतिसाद देत मतदान केल्याचे दिसून येत आहे.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादीने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सोमेश्वर विकास पॅनल मधून निंबूत खंडाळा या गट क्रमांक एक मधून जितेंद्र नारायण निगडे, लक्ष्मण गंगाराम गोफणे, अभिजीत सतीशराव काकडे यांना संधी दिली होती. हे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
राष्ट्रवादीचे अभिजित सतीशराव काकडे यांना सर्वाधिक १८ हजार ५० ३ मते मिळाली. हे उमेदवार नजिकच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा १६ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले, तर लक्ष्मण गोफणे यांना १७ हजार ९२५ मते मिळाली, तर जितेंद्र निगडे यांना १७ हजार ४८१ मते मिळाली
त्यांना मिळालेली मतांची आकडेवारी अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाली नसून काही वेळातच या आकडेवारीसह अपडेट माहिती मिळू शकेल.
मतपत्रिका जुळवणे व गटानुसार त्या जुळवण्यात सुरुवातीचा वेळ गेला असून, पहिल्या गटाची मतमोजणी आता पूर्ण झाली आहे. या कारखान्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असून निवडणुकीपूर्वीच ब प्रवर्गातून राष्ट्रवादीचे तानाजी सोरटे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. आता पहिल्या गटातील उमेदवार विजयी झाल्याने 21 संचालकांच्या या सभागृहातील चार जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत.
आज सकाळी सात वाजता सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीस सुरवात झाली. मतदान अधिक असल्याने तब्बल ४० टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले होते. मतमोजणी प्रक्रियेसाठी २२० कर्मचारी तर पोलिसांचाही १०० हून अधिक जणांचा फौजफाटा या मतमोजणीसाठी ठेवण्यात आला आहे. आज संध्याकाळी उशीरापर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण होईल असा अंदाज आहे.
एकूण मतमोजणीचा अंदाज पाहता या निवडणुकीत सोमेश्वर विकास पॅनलला एकतर्फी विजय मिळेल, असे चित्र आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच जल्लोषाला सुरुवात केली आहे.