इंदापूर

भिमाई आश्रमशाळेत बुद्ध जयंती साजरी

भिमाई आश्रमशाळेत बुद्ध जयंती साजरी

इंदापूर : प्रतिनिधी

येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात जगाला शांतीचा संदेश देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्धांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सेवानिवृत्त भारतीय सैनिक मधुकर लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमस्थळी बुद्ध पौर्णिमेनिमित्त सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरेंनी उपस्थितांना बुद्ध जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे, सचिव ॲड.समीर मखरे,मंगल साळवे ,सुहास पवार तसेच नानासाहेब सानप, अधिक्षक अनिल ओहोळ,अनिसा मुल्ला आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचारी बाळासाहेब गायकवाड,महावीर गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button