सोशल डिस्टनिग चे नियम पाळत विवाह साठी परवानगी द्या:विवाह क्षेत्रातील व्यवसाईकाची मागणी.
एका विवाहावर अनेकाचे रोजगार अवलुबन.
सोशल डिस्टनिग चे नियम पाळत विवाह साठी परवानगी द्या:विवाह क्षेत्रातील व्यवसाईकाची मागणी.
एका विवाहावर अनेकाचे रोजगार अवलुबन.
बारामती:वार्तापत्र जगात कोरोना विरोधी प्रभावी लस निघत नाही तो पर्यंत कोरोना बरोबर जगायचे असल्या कारणाने ‘शुभविवाह’ साठी पूर्वी सारखी परवानगी द्या पण सोशल डिस्टनिग चे नियम पाळत ,मास्क,सॅनिटायझर आदी वापर करत शुभ विवाह संपन्न व्हावेत त्या साठी प्रशासनाने परवानगी द्यावी अशी अपेक्षा विवाह क्षेत्रातील विविध व्यवसाईक यांनी केली आहे
तर दुसरीकडे
सरकारनेच कायमच पन्नासपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीतील लग्नाला परवानगी देऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हा निर्णय सरकारने कायम ठेवला, तर राज्यातील असंख्य शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
आशा दोन बाजू असताना प्रशासन काय भूमिका घेणार या बाबत उत्सुकता आहे.
ना मंगल कार्यालयाचा खर्च…ना पत्रिका छपाई…ना जेवणावळी…ना मानपानाचा खर्च…अत्यंत कमी खर्चात विवाह समारंभ होऊ लागल्याने आता सरकारनेच कायमच पन्नासपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीतील लग्नाला परवानगी देऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हा निर्णय सरकारने कायम ठेवला, तर राज्यातील असंख्य शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
लॉकडाउनच्या काळात प्रारंभी वीसपेक्षा अधिक लोकांना लग्न समारंभासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात नव्हती. आता सरकारने त्यात बदल करत हा आकडा 50 पर्यंत वाढविला आहे. वधू- वर अशा दोन्ही बाजूंचा विचार केल्यास 25 लोकांनाच विवाहप्रसंगी उपस्थित राहता येत असल्याने अगदी जवळच्या नातेवाईकांशिवाय इतरांना बोलावताही येत नाही. त्यामुळे लग्न समारंभावर होणारा खर्च लक्षणीय कमी झाला आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न होणार असल्याने वधू व वर पक्षाचे अनावश्यक खर्च होणारे पैसे वाचतात व कमी बजेटमध्ये लग्न होऊ लागले आहे. अनेकांनी याचे स्वागत केले आहे.
राज्य सरकारने हा निर्णय घेतला तर विदर्भ, मराठवाड्यासह असंख्य शेतक-यांची लग्नाच्या खर्चाची चिंता मिटेल. साधेपणाने लग्न होऊ शकेल, शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, शेतक-याच्या आत्महत्या थांबतील. मुलींच्या लग्नाची चिंता हा बळीराजासाठी एक चिंतेचा विषय असतो. कायमस्वरुपी 50 जणांमध्येच विवाहाला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे सार्वत्रिक स्वागतच होईल, अशी भूमिका शेतकरी नेते करीत आहेत
“लग्नसमारंभात लोकांचे पैसे वाचत असले तरी या वर अवलंबून असलेली मंगल कार्यालय, केटरर्स, मंडप व वाजंत्री मालक, पत्रिका छपाई,निवेदक, भटजी काका,फुलांची व स्टेज सजावट,फोटो व व्हिडीओ शूटिंग ,घोडेवाला,कापड व्यवसाईक, या सारख्या असंख्य व्यावसायिकांचे व्यवसाय मात्र अडचणीत येऊ पाहत आहे. वर्षभरात होणा-या लग्नांमुळे अनेक छोटे व्यवसाय चालत असतात. त्यांना मात्र या नियमाचा मोठा फटका गेल्या तीन महिन्यात बसला आहे. भविष्यात असा निर्णय झाला, तर त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच बंद पडेल, कारण एका विवाहावर जवपळपास 150 ते 200 जणांचा रोजगार प्रत्येक्ष अपरतेक्ष अवलूबन असतो.असे अनेक विवाह होत असताना अनेकांना रोजगार मिळत असतो त्यामुळे शासनाने विवाह 50 लोकांत करण्याऐवजी नियम पाळून पहिल्या सारखे विवाह संपन्न करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी विवाहावर अवळूलुबन असणारी व्यवसाईक मंडळी करीत आहेत.
लॉकडाऊन च्या काळात विवाहाचा खर्च वाचल्याने आता त्या बदल्यात सोने खरेदी होऊ लागली असल्याचे सराफ व्यवसाईक यांनी सांगितले.