” बारामती नगर परिषद शिक्षण विभाग सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना बारामती” च्या अध्यक्षपदी श्री. चंद्रकांत महादेव ढोणे यांची निवड
संस्थेचे सुमारे १०० हुन अधिक सदस्य आहेत.

” बारामती नगर परिषद शिक्षण विभाग सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना बारामती” च्या अध्यक्षपदी श्री. चंद्रकांत महादेव ढोणे यांची निवड
संस्थेचे सुमारे १०० हुन अधिक सदस्य आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ” बारामती नगर परिषद शिक्षण विभाग सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना बारामती” ह्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली असून ह्या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून श्री. चंद्रकांत महादेव ढोणे यांची निवड करण्यात आलेली आहे.
श्री ढोणे यांची सुमारे ३७ वर्ष बारामती नगर परिषदे मधील विविध प्रशालेत शिक्षक आणि भिगवण चौकातील शारदा प्रांगण येथील शाळा क्र ७ मुख्याध्याक म्हणून काम प्रदीर्घ केलेले आहे.
संस्थेचे सुमारे १०० हुन अधिक सदस्य आहेत.या प्रसंगी श्री. ढोणे यांनी संघटनेतील सदस्यांचा अनुभवाचा उपयोग बारामती नगर परिषदे च्या अखत्यारीत असणाऱ्या सर्वच प्रशाळेच्या विकासासाठी होईल असा मनोदय व्यक्त केला.
संस्थेची नवनियुक्त कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष :चंद्रकांत महादेव ढोणे ,उपाध्यक्ष : जवाहर झुम्बरलाल कटारिया ,सचिव : सुधाकर वासुदेव खटावकर ,सहसचिव :रमाकांत भीमराव पवार ,खजिनदार : किशोर नामदेव सोनावणे ,सदस्य :शामराव शिवाजी देवकाते ,सदस्य :पोपट रामचंद्र महामुनी ,सदस्य : रामकृष्ण कृष्णाजी कवितके,सदस्य :दत्तात्रय गणपती कुंभार ,सदस्या : विजया मनोहर जगताप ,सदस्या पुष्पलता मोहन रणसिंग
बारामती शिक्षण क्षेत्र आणि सर्वच स्तरा मधून श्री चंद्रकांत महादेव ढोणे आणि सदस्यांचे अभिनंदन होत आहे.