सोशल मीडिया वरून फसवणूक होत असल्यास तक्रार द्या: उपविभागीय पोलिस अधीक्षक नारायण शिरगावकर.
अनोळखी व्यवक्ती बरोबर संपर्क करू नका.
सोशल मीडिया वरून फसवणूक होत असल्यास तक्रार द्या: उपविभागीय पोलिस अधीक्षक नारायण शिरगावकर.
अनोळखी व्यवक्ती बरोबर संपर्क करू नका.
बारामती वार्ताहर.
कोरोना संसर्ग महामारीच्या (लॉकडाउनच्या कालावधीत) नागरीकांना घरात रहावे लागले.
त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तींकडून सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात करण्यात आलेला आहे. त्यातूनच तरूण मुलामुलींच्या फेसबुक, व्हाट्सॲप,इंस्टाग्राम, व्टिटर, टिकटॉक तसेच अन्य सोशल मिडीयाच्या या वापरातून अनोळखी लोकांची ओळख होवुन त्यातुन मैत्रीचे संबंध निर्माण झाले आहे.
अनोळखी मैत्री झालेल्या व्यक्तींबरोबर यातूनच भावनिकता निर्माण होवून तरूण तरूणींनी आपले वैयक्तिक फोटो, बॅक डाटा, सोशल मिडीयाचे आयडी व पासवर्ड असे प्रायव्हसी
असलेल्या गोष्टी शेयर केल्या आहेत.
पुढच्या अनोळखी मैत्री ठेवलेल्या व्यक्तीकडून फोटों, बॅक डाटा, आयडी व पासवर्ड यांचा वापर करून अश्लिल फोटो तयार करून बदनामी करण्याची धमकी देवुन पैसे उकळणे, शारिरीक संबधाची मागणी करणे यासारखे सायबर क्राईमचे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा प्रकारचे बारामती शहर व बारामती तालुका पोलीस ठाणे मध्ये दोन गुन्हे दाखल असुन त्यामधील आरोपी अटक करण्यात आले आहेत व तपास चालु आहे.
तरी बारामती पोलीस उपविभागातर्फे नागरीकांना जाहीर आव्हान आहे की, वरील नमुद प्रकारचे प्रकार आपल्यासोबत किंवा आपल्या मुलामुलीसोबत घडले असल्यास पालकांनी न घाबरता पुढे येवून तात्काळ संबधित पोलीस ठाणेचे प्रभारी
अधिकारी यांचेकडे संपर्क साधुन तक्रार नोंदवावी. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन ओळख झालेल्या व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नका.
सोशल मिडीयाचा वापर मर्यादित व सुरक्षितपणे चांगल्या हेतूकरिता करण्यात यावा अशी माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी,नारायण शिरगावकर यांनी दिली.