इंदापूर

स्क्रॅपचा ठेका न दिल्याने उद्योगपती जिंदाल यांना मारहाण…

सात जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल.

स्क्रॅपचा ठेका न दिल्याने उद्योगपती जिंदाल यांना मारहाण…

सात जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल.

निमगांव केतकी प्रतिनिधी ; बारामती वार्तापत्र

छत्रपती उदयनराजेंबद्दल अपशब्द वापरल्या कारणे उद्योगपती अशोक जिंदाल यांना मारहाण करून तोंडाला काळे फासणाऱ्या शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक जिंदाल यांचा मुलगा रोहित अशोक जिंदाल (वय 34 ) इंदापुर पोलिस स्टेशनमध्ये हजर राहुन 25 जून रोजी फिर्याद दिली आहे की, माझे चुलते अरुण जिंदाल यांची लोणीदेवकर एम. आय. डी. सी. ता. इंदापुर येथे YAXIS STRUCTURAL STEELS PVT LTD ही कंपनी असुन त्या कंपनीचे कामकाज मी व माझे वडील पाहतो, त्यामुळे वारंवार मी व माझे वडील कंपनीच्या कामानिमित्त कंपनीत व इंदापुरला येत असतो.

मागील वर्षभरा पासून इंदापुर येथील दिपक काटे व त्यांचे इतर सहकारी हे माझे वडील अशोक जिंदाल व मला आमचे कंपनीचे लेबर कन्ट्रक्ट व स्क्रपचे साहित्य उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी भेटले होते. कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याची वारंवार मागणी करत होते. परंतु आम्ही दिपक काटे व त्यांचे सहकारी यांना कन्ट्रक्ट देणेबाबत विचार करून कळवू असे सांगितले होते. तरीही दिपक काटे व त्यांचे इतर सहकारी हे लोणीदेवकर येथील आमचे कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्ट व स्क्राप साहित्य उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी मला व माझे वडील अशोक जिंदाल यांना दमदाटी करत होते.

दि 24 जुन रोजी संध्याकाळी 07.15 वाजण्याच्या सुमारास मी माझे वडील अशोक जिंदाल कंपनीचे मनेजर सुहास बददी व कार चालक असे आम्ही पुण्याला निघालो असता लोणीदेवकर एमआयडीसी चैकात दिपक उर्फे आण्णा सिताराम काटे (वय- 28 वर्षे रा. इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे ), व त्याचे इतर साथीदार त्यांनी आम्हाला पाहुन आम्ही जात असताना आमच्या गाडीला आडवे येवुन जबरदस्तीने गाडी आडवून माझे वडील अशोक जिंदाल यांना तु खाली उतर असे म्हणुन गचांडीला धरून गाडीतून बाहेर खाली ओढुन तु आम्हाला स्क्रपचे कॉन्ट्रॅक्ट तसेच लेबर कॉन्ट्रॅक्ट का देत नाहीस असे म्हणुन मारहाण केली. तसेच माझे वडिलांना व मला मारहाण करून वडीलांचा चश्मा फोडला व आमचे गाडीचे 2 ते 3 लाख रूपयेचे नुकसान केले तसेच माझ्या व वडिलांच्या मोबाईलचे नुकसान केले.

वडिलांच्या अंगावरील कपडे फाडून तोंडावर काळ्या रंगांचे केमीकल फेकले व मोठमोठयाने शिवीगाळ करून त्यांनी वडीलांना त्यांचेकडील चार चाकी गाडीत जबरदस्तीने घालून इंदापुर बाजुकडे त्यांना घेवून गेले. त्यानंतर आम्ही घाबरून इंदापुर पोलीस स्टेशनला आलो. त्यावेळी त्या लोकांनी माझ्या वडिलांनाही इंदापूर पोलीस स्टेशनला आणले होते. त्यावेळी मला माझ्या वडीलांनी सांगितले की यांनी मला जबरदस्तीने गाडीतुन आणताना माझे जवळील ५,५०००० किंमतीचा माल वरील लोकांनी काढून घेतल्याचे वडीलांनी सांगितले.

त्यानंतर माझ्या वडीलांची अवस्था पाहून पोलीसांनी तात्काळ वडीलांना औषधोपचारकामी उपजिल्हा रुग्णालय इंदापुर येथे पाठविले व तेथे डॉक्टरांनी वडिलांना तपासून पुढील औषधोपचारकामी पुणे येथे पाठविले.
इंदापूर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button