स्थानिक

स्ट्रँक्चरल इंजिनिअर्स चे कार्य कौतुकास्पद :अजित पवार

नागरिकांची सुरक्षितता महत्वाची समजून बांधकामे उभी करावीत असेही पवार यांनी सांगितले.

स्ट्रँक्चरल इंजिनिअर्स चे कार्य कौतुकास्पद :अजित पवार

नागरिकांची सुरक्षितता महत्वाची समजून बांधकामे उभी करावीत असेही पवार यांनी सांगितले.

बारामती वार्तापत्र

पुढील शंभर वर्ष बांधकामे टीकावीत व नागरिकांची सुरक्षितता महत्वाची समजून,टॅक्स रुपी पैसा देशाचा आहे याची जाणीव ठेऊन नाविन्याचा ध्यास धरून गुणवत्ता व दर्जा ग्राहकांना द्या असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

रविवार 29 मे रोजी इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रँक्चरल इंजिनिअर्स च्या बारामती लोकल सेंटर चा शुभारंभ व पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ प्रसंगी अजित पवार बोलत होते. या प्रसंगी पुणे सेंटर चे चेअरमन धैयशील खैरेपाटील, नगर परिषद चे मुख्धिकारी महेश रोकडे, बिल्डर असोसिएशन चे माजी अध्यक्ष मनोज पोतेकर, रणधीर भोईटे, व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर,बिमा चे अध्यक्ष धनंजय जामदार आदी मान्यवर उपस्तित होते.

बांधकाम करताना इंग्रजाचा आदर्श घ्या, आजही बांधकाम खात्यास पुलाच्या किंवा बांधकामाच्या संदर्भात देखभाली साठी पत्रे येतात त्याच प्रमाणे शासनाच्या नियमावली चे पालन करीत नागरिकांची सुरक्षितता महत्वाची समजून बांधकामे उभी करावीत असेही पवार यांनी सांगितले.

स्ट्रँक्चरल इंजिनिअर्स सेंटर बारामती, इंदापूर दौंड, पुरंदर, फलटण, माळशिरस,माढा, करमाळा,कर्जत,श्रीगोंदा तालुक्यातील अभियंते यांच्या समवेत काम करणार असून, त्याची आवश्यकता,शासनाच्या अटी, नियम, व या पुढील कार्याची दिशा सांगून बाधकाम क्षेत्रातील अभियंते यांना मार्गदर्शन करणारे स्ट्रँक्चरल इंजिनिअर्स आहेत यांची माहिती नवनिर्वाचित चेअरमन शामराव राऊत यांनी दिली.
रणधीर भोईटे,धैयशील खैरेपाटील यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी अजित पवार यांच्या हस्ते चेअरमन शामराव राऊत, सचिव सूरज चांदगुडे, खजिनदार मयूर ताडे, सदस्य हर्षवर्धन शिंदे, श्रीकांत बोबडे,समीर कोकरे, गणेश नरुटे,व सल्लागार संजय कदम यांनी पदग्रहण केले पवार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत हरित व स्वच्छ बारामती करण्यासाठी स्ट्रँक्चरल इंजिनिअर्स पुढाकार घेणार असल्याचे सदस्य हर्षवर्धन शिंदे यांनी सांगितले.

या प्रसंगी शामराव राऊत यांनी एक लाख रुपये गंगाजळी म्हणून सेंटर ला दिले तर हर्षवर्धन शिंदे यांनी भाडे न घेता सेंटर च्या कार्यालय साठी गाळा देण्याचे जाहीर केले आभार सुरज चांदगुडे यांनी मानले सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram