आपला जिल्हा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई जिल्ह्यात पेट्रोल पंपांतील पेट्रोल आणि डिझेल चोरणार्‍या आंतरराज्य टोळीतील तीघांना अटक करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पंपावरील पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई जिल्ह्यात पेट्रोल पंपांतील पेट्रोल आणि डिझेल चोरणार्‍या आंतरराज्य टोळीतील तीघांना अटक करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पंपावरील पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते.

बारामती वार्तापत्र क्राईम रिपोर्ट

त्यांच्याकडून एक ट्रक, 2 कॅन, , मेटल कटर पान्हा, पाईप, मोबाईल असा 16 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
श्रीराम लाला काळे (वय 19), दशरथ भीमा काळे (21), नाना गोविंद पवार (56), सर्व रा. तेरखेडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात पंपावरील पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी मा पोलीस अधीक्षक सो श्री अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांनी पथक तयार केले होते. या पथकाने इंधन चोरीबाबतच्या गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील टोळी पेट्रोल, डिझेल चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय, सर्व संशयित वारंवार ट्रकमधून माल घेऊन पुणे बाजूकडे येत असल्याचेही स्पष्ट झाले होते. आज रोजी विशेष पथकाला माहिती मिळाली होती की संशयित हे तेरखेडा ता वाशी जी उस्मानाबाद येथील असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
त्यानुसार पथकाने तेरखेडा ता वाशी येथील फाट्यावरील एका पंपाची टेहळणी करताना 3 जण दिसून आले. त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील पंपावरून पेट्रोल, डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे सदरच्या आरोपी कडून खालिल गुन्हे उघडकीस आले आहेत
१) इंदापूर पो स्टे गु र नं ११९७/२०२० भा द वी 379
२) इंदापूर पो स्टे गु र नं १०३३/२०२० भा द वी 379
३) वालचंदनगर पो स्टे ५१५/२०२० भा द वी 379
४) नातेपुते पो स्टे गु र नं ३७१/२०२० भा द वी 379
५), अकलूज पो स्टे गु र नं ४४९/२०२० भा द वी 379 वरील सर्व गुन्ह्यात मिळून एकूण 17हजार 718 लिटर डिझेल ऐकून 13लाख 40 हजार रु किंमतीचे चोरी केले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक श्री डॉ अभिनव देशमुख सो अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट ,
पो स ई शिवाजी ननवरे ,सहा फो दत्तात्रय गिरमकर,पो हवा अनिल काळे ,पो हवा रविराज कोकरे,पो हवा उमाकांत कुंजीर,,पो हवा काशीनाथ राजपुरे ,पो ना विजय कांचन ,पो ना अभिजित एकशिंगे ,पो ना जनार्दन शेळके,पो ना राजू मोमिन ,पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.
सदरच्या गुन्ह्यातील आरोपी नामे दशरथ भीमा माने वय 21 वर्षे याचेवर व त्याचे साथीदारावर दाखल असलेले गुन्हे
१) रामदुर्ग पो स्टे गु र नं 228/18 भा द वी 379
२) खानापूर पो स्टे 197/18 भा द वी 379
३) राम दुर्ग पो स्टे 235/18 भा द वी 379
4) भेल गोल कर्नाटक पो स्टे 136/18 भा द वी 379
5)शंखेश्वर पो स्टे  गु र नं 264/18  भा द वी 379
6) बार्शी पो स्टे 188/19  भा द वी 457
7) मिरज पो स्टे 8/2019 भा द वी 379 ,34
8) तासगाव पो स्टे 366/18 भा द वी 379
तसेच सांगली जिल्ह्यात डिझेल चोरी बाबत चे इतर 8 गुन्हे दाखल आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram