स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी मोबाईल टॉवर च्या बँटरी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
५,००,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी मोबाईल टॉवर च्या बँटरी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
५,००,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
क्राईम;बारामती वार्तापत्र
मा.डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो. पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्ह्यामध्ये विविध कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या बँटरी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कारवाई करणे बाबत सूचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.अशोक शेळके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांना सूचना दिल्या होत्या.
आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शिक्रापूर परिसरात पहाटेच्या वेळी गस्त करीत असताना, पो.ना योगेश नागरगोजे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा उदय बाळासाहेब काळे, रा.तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर, जि.पुणे यांनी त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केला आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याप्रमाणे गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उदय बाळासाहेब काळे, रा.तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर, जि.पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार १) प्रवीण रमेश मांढरे, वय ३० वर्षे, रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे २) अक्षय अशोक शेलार वय २६ वर्षे, रा.तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर, जि.पुणे ३) अक्षय बाळासाहेब वांभुरे, वय २८ वर्षे, रा.वाडा गावठाण, ता.शिरूर, जि.पुणे यांचे मदतीने केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशी मध्ये त्यांनी शिक्रापूर पोस्टे गु र नं ७७४/२०१९ भा.द.वि कलम ३७९ हा गुन्हा देखील केल्याची कबुली दिलेली आहे. तसेच वर नमूद आरोपींनी दोन्ही गुन्ह्यातील एकुण ३० बॅटच्या चोरल्याची कबुली दिली असून चोरलेल्या बॅटच्या त्यांनी आरोपी नामे राजकुमार महादेव यादव टिळेकर नगर सर्वे नंबर ५२ कोंढवा बुद्रुक पुणे यास विकल्याचे सांगत असून गुन्हा करते वेळी त्यांनी राजकुमार यादव याचे अशोक लेलँड कंपनीचे चार चाकी वाहन MH125F 8205 हे बँटरी चोरी करण्यासाठी वापरल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपींकडुन गुन्हयात वापरलेला चारचाकी टेम्पो नं.MH125F8205 ५,००,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाचही आरोपींना शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर आरोपींकडून खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत,
१) शिक्रापूर पोस्टे गु.र.नं. ७७३/२०२१ भादवि ३७९
२) शिक्रापूर पो.स्टे गु.र.न. ७७४/२०२१ भादवि ३७९
सदरची कामगिरी ही मा.डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री. मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अशोक शेळके, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा.फौज.पंदारे, पो.हवा जनार्दन शेळके, पो.हवा.अजित भुजबळ, पो.हवा. राजू मोमीन, पो.हवा सचिन घाडगे,पो.ना. मंगेश थिगळे,पो.ना.योगेश नागरगोजे,स, फौ मुकुंद कदम, पो.शि अक्षय जावळे यांनी केली.