स्थानिक

बारामतीत भव्य फोटोग्राफर महामेळावा संपन्न

बारामती फोटोग्राफर असोसिएशन व कीर्ती स्टोअर्स पुणे यांचे संयुक्त आयोजन – तब्बल ४०० हून अधिक फोटोग्राफरांचा उत्स्फूर्त सहभाग

बारामतीत भव्य फोटोग्राफर महामेळावा संपन्न

बारामती फोटोग्राफर असोसिएशन व कीर्ती स्टोअर्स पुणे यांचे संयुक्त आयोजन – तब्बल ४०० हून अधिक फोटोग्राफरांचा उत्स्फूर्त सहभाग

बारामती वार्तापत्र

बारामती फोटोग्राफर असोसिएशन आणि कीर्ती स्टोअर्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे भव्य फोटोग्राफर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात जिल्ह्यासह परिसरातील तब्बल ४०० हून अधिक फोटोग्राफर बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या महामेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे ३२ नामांकित कंपन्यानचे स्टॉल व नामांकीत कंपन्यानचे कॅमेरे, लेन्सेस, लाईट्स, हार्ड डिस्क, 360 कॅमेरा, कॅमेरा बॅग व विविध फोटोग्राफी मटेरियल विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. कीर्ती स्टोअर्स पुणे यांच्या माध्यमातून सर्व साहित्य अतिशय योग्य दरात विक्रीस ठेवण्यात आले होते

फोटोग्राफर बांधवांना एकमेकांशी भेटीगाठी घेण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची तसेच व्यवसायिक नेटवर्क मजबूत करण्याची संधी या मेळाव्यात मिळाली. त्यामुळे उपस्थित फोटोग्राफरांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले
या कार्यक्रमासाठी कीर्ती स्टोअर्स पुणे चे लालचंद शेठ, सुप्रसिद्ध मार्गदर्शक सुमित जैन, किशोरभाई यांच्यासह बारामती व परिसरातील मान्यवर उपस्थित होते. तसेच दौंड, केडगाव, उरुळी कांचन, भिगवण, इंदापूर, मोरगाव, जेजुरी, फलटण आदी ठिकाणांहून फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

बारामती फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ म्हणाले की,”सर्व फोटोग्राफर बांधवांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या मेळाव्यामुळे बारामतीत फोटोग्राफी व्यवसायाला नवी दिशा मिळाली असून, अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही सातत्याने केले जाईल.” या भव्य महामेळाव्यामुळे बारामतीसह संपूर्ण परिसरातील फोटोग्राफर समुदायात नवा उत्साह, प्रेरणा व व्यावसायिक प्रगतीची नवी दिशा निर्माण झाली आहे.

Back to top button