इंदापूर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसच किंगमेकर ठरेल – दादूशेठ खान

काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत विश्वास केला व्यक्त

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसच किंगमेकर ठरेल – दादूशेठ खान

काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत विश्वास केला व्यक्त

इंदापूर : प्रतिनिधी

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते इंदापूरला प्रचारासाठी येतील. इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची ताकत जरी जास्त असली तरी येणाऱ्या काळात काँग्रेसच किंगमेकर ठरणार आहे, आणि ते निवडणुकांमधून व मतांमधून सिद्ध होईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व पुणे जिल्हा काँग्रेसचे सह प्रभारी दादू खान यांनी व्यक्त केला.बुधवारी (दि.१६) इंदापूरमध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक पार पडली.यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,पुढील काही दिवसात काँग्रेसमध्ये सुद्धा काही प्रवेश होतील.नवीन लोकांसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत.इंदापूर तालुक्यामधील काँग्रेस पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. सध्या सुरू असलेले काँग्रेस पक्षाचे सभासद नोंदणी अभियान गावोगावी बूथ लेवलला व प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवून जास्तीत जास्त सभासद नोंदवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे डिजिटल सभासद नोंदणी अभियान सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील सभासद नोंदणीचा अहवाल घेण्यासाठी खान इंदापूर येथे आले होते.यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी स्वागत केलं व संपूर्ण तालुक्याचा आढावा दिला. यावेळी कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर,उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जकिरभाई काझी , शहराध्यक्ष चमनभाई बागवान, किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.संतोष होगले, सरचिटणीस महादेव लोंढे, राहुल वीर, संतोष आरडे, खजिनदार भगवान पासगे, जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आकाश पवार,श्रीनिवास पाटील, निखिल निंबाळकर , निसार शेख, बाळासाहेब गायकवाड, चंदनशिवे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button