स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टाने दिले हे आदेश
सप्टेंबर महिन्यात निवडणुका होणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टाने दिले हे आदेश
सप्टेंबर महिन्यात निवडणुका होणार?
नवी दिल्लीः प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने जिथे पाऊस नाही तिथे निवडणुका घ्यायला काय हरकत आहे?, असा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर महिन्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायती निवडणूका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, महाराष्ट्र सरकारने पावसाळ्याचे कारण देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आणखी वेळ हवा असल्याचे म्हटलं होते. पण, राज्य निवडणूक आयोगाने कोणतीही सल्लामसलत न करता सर्वोच्च न्यायलयात अर्ज दाखल केल्याने आघाडी सरकार नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळं आज सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.
कोकण आणि मुंबईत पावसाळ्यानंतर निवडणुका घ्या असे आदेश देण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने याआधीच सांगितलं होतं, त्याप्रमाणे सप्टेंबरमध्ये शहरी भागात आणि ऑक्टोबरमध्ये ग्रामीण भागात निवडणुका घ्याव्यात असं सांगितलं होतं. यावर आज सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला हे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
जिथे पाऊस कमी पडतो म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या भागात निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात असं कोर्टाने सांगितलं आहे महत्त्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडणार, हे आता नक्की झालंय.
राज्यात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900 ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत.