ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना कंडक्टर करतो अन् सुप्रियाला सांगतो तिकीट काढ; अजित पवारांची तुफान टोलेबाजी
"तू बोलू नकोस शहाण्या... आपली झाकली मूठ सव्वा लाखाची"

ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना कंडक्टर करतो अन् सुप्रियाला सांगतो तिकीट काढ; अजित पवारांची तुफान टोलेबाजी
“तू बोलू नकोस शहाण्या… आपली झाकली मूठ सव्वा लाखाची”
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत विकासकामांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली. अजित पवार यांच्या भाषणावेळी एका कार्यकर्त्याने काऱ्हाटीच्या शाळेत जायला बस सुरु करा, अशी मागणी केली. कार्यकर्त्याची ही मागणी ऐकल्यानंतर अजित पवारांनी ग्रामस्थांना उद्देशून टोलेबाजी केली. “ड्रायव्हर म्हणून मी बसतो. साहेबांना (शरद पवार) कंडक्टर ठेवतो. आणि सुप्रियाला तिकीट काढायला लावतो.अरे आधीची परिस्थिती बघा. आता परिस्थिती बदलत आहे. असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
“बारामतीत किती निधी आला ते बघा. किती निधी आला मी सांगत नाही हे चॅनलवाले लगेच दाखवतील ब्रेकिंग न्यूज म्हणून”, असं अजित पवार म्हणाले. यावेळी मधेच एक ग्रामस्थ किती निधी आला ते सांगत होता. तेवढ्यात अजित पवार बोलले तू गप्प बस ना बाबा! झाकली मूठ सव्वा लाखाची, राहुदेत ना!”, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.
पाण्याचे दर कमी करा, अशी कार्यकर्त्यांची मागणी केली. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. “यातल्या एकाला खासदार आणि एकाला आमदार करा. यांना वाटतं आम्ही काहीच कामं करीत नाहीत. हे लोकं अशी तुमच्या समोर कामं सांगतात. मग तुम्हाला वाटतं बघा यांना किती काळजी आहे”, असं अजित पवार म्हणाले.