स्प्रिंग आणि हायबर्नेट उद्योजकीय यशासाठी फ्रेमवर्क्स या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे संपन्न
१५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग
स्प्रिंग आणि हायबर्नेट उद्योजकीय यशासाठी फ्रेमवर्क्स या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे संपन्न
१५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग
बारामती वार्तापत्र
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील बीबीए (सीए) विभागाने ऑरेंज आयटेक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्याशी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत उद्योजकता विकास सेल (इडी सेल) यांच्या संयुक्ताने स्प्रिंग आणि हायबर्नेट उद्योजकीय यशासाठी फ्रेमवर्कस या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा ७ डिसेंबर २०२४ रोजी जीवराज हॉल येथे आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्त्या म्हणून ऑरेंज आयटेक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अर्चना निगडे उपस्थित होत्या. त्यांनी स्प्रिंग आणि हायबर्नेट फ्रेमवर्कसच्या व्यावहारिक उपयोगांवर प्रकाश टाकला, आधुनिक व स्केलेबल सॉफ्टवेअर सोल्युशन्स तयार करण्यासाठी त्यांचे महत्व सांगितले. तसेच उद्योजकीय यशाच्या कथा आणि धोरणे सांगून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित नवकल्पना आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमात ऍटोसचे वरिष्ठ सॉफ्टवेअर डेव्हलपर ओंकार नाईक यांनीही विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयारी आणि ताज्या तंत्रज्ञानाची माहिती ठेवण्याचे महत्व समजावून सांगितले. त्यांनी आयटी कंपनीच्या अपेक्षा आणि करिअर उन्नतीसाठी उपयुक्त टिप्स विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांनी सामंजस्य कराराच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला, आणि या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विभागप्रमुख प्रा.माधुरी सस्ते यांनी महाविद्यालय आणि उद्योग यामधील सहकार्याचे महत्व अधोरेखित केले.
सामंजस्य करार हा विद्यार्थ्यांसाठी नवे दार उघडणारा ठरेल, ज्यामुळे त्यांना इंटर्नशिप, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प विकासासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.
कार्यक्रमात बीबीए सीए विभागातील दुस-या वर्षातील एसवायबीबीए (सीए) आणि तिसऱ्या वर्षातील टीवायबीबीए सीए १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सामंजस्य कारणाखाली आयोजित केलेली कार्यशाळा विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान आणि उद्योजकीय दृष्टिकोन प्रदान करणारी ठरली, ज्यामुळे त्यांना आयटी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्व्यक म्हणून तसेच सूत्रसंचालन सलमा शेख यांनी केले.