स्मशानभूमीतच युवकाची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार
पुण्यातील मांजरीमध्ये असलेल्या स्मशानभूमीत रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास सोनवणे नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला.

स्मशानभूमीतच युवकाची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार
पुण्यातील मांजरीमध्ये असलेल्या स्मशानभूमीत रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास सोनवणे नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला.
क्राईम बारामती वार्तापत्र
स्मशानभूमीतच युवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाच जणांनी मिळून तरुणाची निर्घृण हत्या केली. पुणे जिल्ह्यात लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत मांजरीतील स्मशानभूमीत ही घटना घडली. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील मांजरीमध्ये असलेल्या स्मशानभूमीत रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास सोनवणे नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला. एकूण पाच जणांनी विकासची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यापैकी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा प्रकार लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असून पोलीस पुढील तपास करत आहेत.