आपला जिल्हा

“स्वच्छता ही सेवा”चा इंदापुरात समारोप 

उल्लेखनीय सेवा बजाविणाऱ्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान..

“स्वच्छता ही सेवा”चा इंदापुरात समारोप 

उल्लेखनीय सेवा बजाविणाऱ्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान..

इंदापूर,आदित्य बोराटे –

इंदापुरातील नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत “स्वच्छता ही सेवा”या उपक्रमाचा समारोप गुरुवारी (दि.2) राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दीपप्रज्वलन करून व महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, अशोक इजगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, दीपक जाधव, मुख्याधिकारी रमेश ढगे आदी उपस्थित होते.

 

यावेळी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले. यावेळी उल्लेखनीय सेवा बजाविणाऱ्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2025 व पाककला स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व बक्षिसे प्रदान केली. दिव्यांग महिला रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार झाला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत बचत गटांना प्रत्येकी चार लाख बीज भांडवल प्रदान केले. तर शहरातील 176 दिव्यांग लाभार्थ्यांना 8 लाख 62 हजार रुपयांचे अनुदान वितरण करण्यात आले.

विविध स्पर्धातील विजेते

गणेशोत्सव स्पर्धा : नरसिंह प्रासादिक गणेश मंडळ, कासारपट्टा, श्रीमंत शिवराज मंडळ, मंडई, छत्रपती शिवाजी मंडळ, खडकपुरा

पाककला स्पर्धा : माधवी कांबळे, सपना वाघमारे, कविता खंडाळे

दिव्यांग महिला रांगोळी स्पर्धा :जयश्री नगरकर, शीतल परदेशी, ज्योती शेलार

Back to top button