स्वाभिमानी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शैलेश काटे यांची फेरनिवड : उपाध्यक्षपदी धनंजय कळमकर
'स्वाभिमानी कट्टा' हा उपक्रम पुढे ही निरंतर चालू ठेवण्याचा निर्णय

स्वाभिमानी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शैलेश काटे यांची फेरनिवड : उपाध्यक्षपदी धनंजय कळमकर
‘स्वाभिमानी कट्टा’ हा उपक्रम पुढे ही निरंतर चालू ठेवण्याचा निर्णय
इंदापूर
इंदापूर तालुका स्वाभिमानी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शैलेश काटे यांची फेरनिवड झाली तर उपाध्यक्षपदी धनंजय कळमकर यांची निवड करण्यात आली.
विद्यमान अध्यक्ष शैलेश काटे यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर येथील शासकीय स्वाभिमानी पत्रकार संघाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या वेळी सर्वाच्या सहमतीने स्वाभिमानी पत्रकार संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली.
या बैठकीत पत्रकारांचे न्याय्य हक्क अधिकार, आरोग्य, पत्रकार भवन व पत्रकार वसाहत व पत्रकार दिनानिमित्त घ्यावयाच्या कार्यक्रमाचे नियोजन याबाबत चर्चा झाली.

पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष नव्या जोमाने व निर्भिडपणे सुरु ठेवण्याचा,पत्रकार संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुरु करण्यात आलेला ‘स्वाभिमानी कट्टा’ हा उपक्रम पुढे ही निरंतर चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.सर्व पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.जितेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. धनंजय कळमकर यांनी आभार मानले.
निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशी : अध्यक्ष – शैलेश काटे. उपाध्यक्ष- धनंजय कळमकर,कार्याध्यक्ष- इम्तिहाज मुलाणी,सचिव – राहुल ढवळे, सहसचिव – नानासाहेब लोंढे, खजिनदार – आदित्य बोराटे, कायदेशीर सल्लागार – ॲड. सिद्धार्थ मखरे. मुख्य प्रवक्ता – जितेंद्र जाधव, मार्गदर्शक – महेश स्वामी, कैलास पवार, सदस्य – असिफ शेख, दीपक खिलारे, सलिम शेख, मुख्तार काझी, अतुल सोनकांबळे, दत्ता पारेकर, अशोक घोडके,दत्ता मिसाळ.
_____________________________






