स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या पाठपुराव्याची शिक्षण विभागाने घेतली दखल.
शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मागविले मार्गदर्शन.
स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या पाठपुराव्याची शिक्षण विभागाने घेतली दखल.
शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मागविले मार्गदर्शन.
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी शिक्षक परिवारातील शिक्षक संघ,इब्टा, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक भारती या शिक्षक संघटनांच्या तालुका अध्यक्षीय शिष्टमंडळाने इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कोविड-19 च्या ड्यूट्या रद्द करून ऑनलाइन शिक्षणासाठी वेळ देण्यात यावा यासाठी गटविकास अधिकारी विजयकुमार परिट आणि गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. त्यास प्रतिसाद देत पंचायत समिती शिक्षण विभागाने शिक्षकांच्या कोविड19 वरील ड्युट्या रद्द करण्यासाठी शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद पुणे यांचेकडे मार्गदर्शन मागविले आहे.त्यात शालेय शिक्षण विभागाचा 17ऑगस्ट 2020 चा शासन निर्णय संदर्भ म्हणून दर्शविण्यात आलेला आहे.
स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या अध्यक्षीय शिष्टमंडळातील नानासाहेब नरूटे,सहदेव शिंदे,सुहास मोरे,बाळासाहेब चव्हाण आणि शशिकांत शेंडे यांनी गटविकास अधिकारी विजयकुमार परिट आणि गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांचे आणि पत्रकार बांधवांचे आभार मानले.
शिक्षक संघटनांच्या या मागणीची दखल सर्वप्रथम बारामती वार्तापत्र ने घेतली असल्याने संघटनांकडून आभार व्यक्त करण्यात आले.