स्थानिक

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत भव्य जलतरण स्पर्धा;१६० जलतरणपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

तब्बल १६० जलतरणपटूंनी सहभाग

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत भव्य जलतरण स्पर्धा;१६० जलतरणपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

तब्बल १६० जलतरणपटूंनी सहभाग

बारामती वार्तापत्र 

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर स्विमर्स क्लब, बारामती यांच्या वतीने भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पुणे, मुंबई, रत्नागिरी, सोलापूर यांसह विविध शहरांतील तब्बल १६० जलतरणपटूंनी सहभाग घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण इंगळे, नगरसेविका भारती विश्वास शेळके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने, क्रीडा अधिकारी महेश चावले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी वीर सावरकर स्विमर्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, सचिव विश्वास (नाना) शेळके, खजिनदार मिलिंद अत्रे, संचालक अमोल गावडे, बाळासाहेब टाटिया, अनिल सातव, दीपक बनकर तसेच सल्लागार राजेंद्र जाधव आणि महेंद्र ओसवाल यांनी स्पर्धेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

स्पर्धेचे यशस्वी नियोजन करण्यासाठी महेश साळुंखे, जमीर शेख, संतोष कुलकर्णी, इरफान तांबोळी आणि सत्यवान गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले. विविध वयोगटांतील जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेला रंगत आणली. आयोजकांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करत भविष्यातही अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Back to top button