इंदापूर

हडपसर ते वरवंड पीएमपीएमएल बस सेवा सुरू ; राज्यमंत्री भरणेंनी झेंडा दाखवून केला शुभारंभ

प्रवाशांना दळणवळण होणार सोयीस्कर

हडपसर ते वरवंड पीएमपीएमएल बस सेवा सुरू ; राज्यमंत्री भरणेंनी झेंडा दाखवून केला शुभारंभ

प्रवाशांना दळणवळण होणार सोयीस्कर

इंदापूर : बारामती वार्तापत्र
हडपसर ते वरवंड पहिली पीएमपीएमएल ( पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड )
बस सेवा रविवार ( दि.२० ) पासून सुरू करण्यात आली असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला.

पीएमपीएमएल बस सेवा हडपसर
ते वरवंड अशी सुरू करण्यात करण्यात आली असून हडपसर-चौफुला-वरवंड अशी पहिली बस पुणे-सोलापूर महामार्गावर धावली. यावेळी महाराष्ट्राचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, यांनी बसला झेंडा दाखवून वरवंड ते चौफुला PMPML ची तिकीट काढून प्रवास केला.

या मार्गावरून बस सेवा चालू केल्यामुळे दैनंदिन कामकाजा निमित्ताने पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना तसेच दौंड तालुक्यातील प्रवाशांचे दैनंदिन दळणवळण सोयीस्कर होणार आहे.

Related Articles

Back to top button