हर्षवर्धन पाटील यांचेकडून वडापुरी येथील जनावरांच्या जळीतग्रस्त गोठ्याची पाहणी
आर्थिक मदत करण्याचे केले जाहीर

हर्षवर्धन पाटील यांचेकडून वडापुरी येथील जनावरांच्या जळीतग्रस्त गोठ्याची पाहणी
आर्थिक मदत करण्याचे केले जाहीर
इंदापूर:प्रतिनिधी
वडापुरी येथील जनावरांच्या जळीतग्रस्त गोठ्याची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.८) सायंकाळी पाहणी केली.अवसरी रस्त्यावर असलेल्या गोविंद बाळासाहेब निंबाळकर या शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्यास रविवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने गोठा जळून ४ गाई मृत्युमुखी पडल्या तर इतर ३ जनावरे जखमी झाली आहेत.
यावेळी घटनास्थळावरून हर्षवर्धन पाटील यांनी महसूल, वीज मंडळ, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करून जनावरे मृत झाल्याने गोविंद निंबाळकर यांना तातडीने शासकीय मदत व सहकार्य करण्याच्या सूचना केल्या, त्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या. तसेच यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले. या भेटीप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, राजेंद्र पाटील, बापू चंदनशिवे, धनाजी जाधव, घन:श्याम थोरात, राजेंद्र देवकर, विठ्ठल पिंगळे, निजाम शेख, किशोर फडतरे, उमेश यादव, किरण शिर्के, सुरेश यादव, पशुधन अधिकारी पशुधन अधिकारी डॉ.बी.एस.घुगे व शेतकरी उपस्थित होते.