हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.
इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश..
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेतील इंदापूर तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्याचे नाव सर्वत्र मोठे करावे हीच आपल्या तालुक्यासाठी अभिमानास्पद कामगिरी असेल…
पिंपरी खु. येथील अमोल नरुटे यांची नायब तहसीलदार पदी तर कळाशी येथील सुषमा रेडके यांची नायब तहसीलदार पदी तसेच काटी येथील पूजा गोरे यांची नायब तहसीलदार पदी,काटी येथील अमोल मोहिते यांची उपशिक्षणाधिकारी पदी आणि बाभूळगाव येथील मनोजसिंह खिलारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.
यावेळी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी
स्वत:चा अनुभव सांगत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे अनुभव सांगताना म्हंटले की,
स्पर्धा परीक्षेत कुठल्याही शार्टकट पद्धतीने यश प्राप्त करता येत नाही तर त्याकरिता खूप संघर्ष करुन जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा लागतो. वेळेचे नियोजन करणे बंधनकारक आहे. त्या माध्यमातून नियोजन करुन स्पर्धा परीक्षेचा प्रवास गाठत ठरलेल्या ध्येयापर्यंत निश्चित रुपात पोहोचता येते.