हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना
जनतेच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे हर्षवर्धन पाटील यांचे साकडे

हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना
जनतेच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे हर्षवर्धन पाटील यांचे साकडे
इंदापूर; प्रतिनिधी
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे श्री गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला बुधवारी (दि.27) सकाळी करण्यात आली. यावेळी हर्षवर्धन पाटील व सौ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात विधिवत पूजा व आरती संपन्न झाली.
आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने चालु वर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषामध्ये स्वागत करीत आहोत. आगामी काळातही श्री गणेश कृपेने परतीचा पाऊस हा समाधानकारक येवो, त्यामुळे शेतातील पिके चांगली तरारतील व आगामी वर्षे शेतकरी व नागरिकांसाठी सुख-समृद्धीचे व आनंदाचे जावो, असे साकडे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी श्री गणेश चरणी घातले.
चालू वर्षी गणेशोत्सव 11 दिवसांचा आहे. श्री गणरायाचे आगमन म्हणजे आनंद आणि उत्साहाची आपणा सर्वांसाठी पर्वणीच असते. महाराष्ट्रामध्ये घराघरात गणरायांचे उस्फूर्तपणे स्वागत केले जात आहे, तसेच हा उत्सव देशभर आनंदाने साजरा केला जात आहे. श्री गणराया प्रत्येकाचे आयुष्य हे प्रगतीचे, भरभराटीचे व समाधान घेऊन येवो, या शब्दात जनतेला गणेशोत्सवानिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात सुखकर्ता व विघ्नहर्ता असलेल्या श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते. भाग्यश्री निवासस्थानी श्री गणरायाच्या मूर्तीला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, निरा भिमा कारखान्याच्या चेअरमन सौ.भाग्यश्री पाटील, युवा नेते राजवर्धन पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत गणरायाचे यावेळी मंत्रोपचारामध्ये मनोभावे स्वागत केले.