इंदापूर
हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का;चुलत बंधू राष्ट्रवादीच्या गोठ्यात
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित केला पक्ष प्रवेश

हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का;चुलत बंधू राष्ट्रवादीच्या गोठ्यात
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित केला पक्ष प्रवेश
इंदापूर : प्रतिनिधी
भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांनी पुणे येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
प्रशांत पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती होते.आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.तसेच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका होणार आहेत.याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल असे राजकिय जाणकारांचे मत आहे.
या प्रवेशा नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून तालुका राष्ट्रवादीमय करणार असे वक्तव्य प्रशांत पाटील यांनी केले आहे.