हर्षवर्धन पाटील व पद्माताई भोसले यांनी उजनी पाणलोट क्षेत्रातून बोटीने प्रवास करत लावली कार्यक्रमास उपस्थिती
अनेक जुन्या कार्यकर्त्यांसोबत साधला संवाद
हर्षवर्धन पाटील व पद्माताई भोसले यांनी उजनी पाणलोट क्षेत्रातून बोटीने प्रवास करत लावली कार्यक्रमास उपस्थिती
अनेक जुन्या कार्यकर्त्यांसोबत साधला संवाद
इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी आज मंळवार दि. ३० मार्च २०२१ रोजी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गायकवाड, रणगाव यांच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी इंदापूर तालुक्यासाठी वरदान लाभलेल्या उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातून बोटीने प्रवास करत कुगाव ता.करमाळा याठिकाणी कार्यक्रमास उपस्थिती लावली. प्रवास करते वेळी नदीकाठच्या अनेक गावातील कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या सोबत काम केलेल्या अनेक आजी-माजी जुन्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी गप्पागोष्टी करीत संवाद साधला.
कर्मयोगी भाऊ यांच्यामुळेच या क्षेत्राचा कायापालट कसा झाला हे लोकांच्या तोंडून ऐकण्यास मिळाले. आजदेखील कर्मयोगी भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील व पद्माताई भोसले यांच्या माध्यमातून या भागाचा विकास पुढे सातत्याने सुरू आहे. यातूनच या भागाला आर्थिक सुबत्ता मिळाली आहे. याचे दर्शन आज देखील होत आहे. अशा अनेक प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केल्या.
बोटीने प्रवास करीत संवाद साधत असताना कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न मुद्रा या वेळी दिसून येते होती.
हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी शेती, पाणी, साखर कारखानदारी, विजेचे संकट, कोरोना पार्श्वभूमी तसेच बदलत्या परिस्थितीनुसार होणारे समारंभ याविषयीचा संवाद कार्यकर्त्या सोबत केला.