हर्षवर्धन पाटील व शहा कुटुंबातील कथित विसंवादाच्या चर्चेस अखेर पूर्णविराम
भरत शहा यांचा कर्मयोगी कारखाना निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
हर्षवर्धन पाटील व शहा कुटुंबातील कथित विसंवादाच्या चर्चेस अखेर पूर्णविराम
भरत शहा यांचा कर्मयोगी कारखाना निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले मजबूत स्थान असणारे भरत शहा यांनी इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर ( बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी ( दि.२४ ) दाखल केला.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर गेली दहा वर्षे कार्यकरत असणाऱ्या भरत शहा यांनी एप्रिल महिन्यामध्ये घरगुती कारण सांगत त्यांच्याकडील विविध पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला होता.याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.त्यामुळे यात मोठे राजकारण दडल्याची चर्चा सर्वत्र होती.
दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांचे निष्ठावान सहकारी तथा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा यांचे पुतणे भरत शहा यांनी आपल्याकडील असणाऱ्या विविध पदाचा राजीनामा देताच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरत शहा कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिल्याचे खात्रीलायक वृत्त होते.परंतु दिवंगत शंकरराव पाटील व त्यांच्या कन्या पद्माताई भोसले यांच्याशी निष्ठावंत असणाऱ्या शहा परिवाराने भरत शहा यांच्या राजीनाम्यावरून चाललेल्या चर्चेला आज अखेर पूर्ण विराम दिला असून इंदापूर ऊस उत्पादक गटातून कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २०२०-२१ ते २०२५-२०२६ च्या निवडणूकीस आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.इंदापूरचे तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद, मुकुंदशेठ शहा, भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, प्रमोद राऊत, सुनील तळेकर,पै.दत्ता पांढरे, ॲड.कृष्णाजी यादव,माऊली चवरे, वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, अंगद शहा,राहुल जौजाळ उपस्थित होते.
राष्ट्रवादीचा नाराजांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न निष्फळ…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या लागलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने हर्षवर्धन पाटील गटा मधील नाराजांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला होता मात्र दिवंगत खासदार शंकरराव पाटील,व पाटील घराण्याप्रती असणारी निष्ठा कायम असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न निष्फळ ठरला असून हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगीच्या निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदरच मुसंडी मारल्याचे एकच चित्र आहे.