‘हर घर तिरंगा’ अभियानास माळेगाव बु. येथे उर्त्स्फूत प्रतिसाद-मुख्याधिकारी बालाजी लोंढे
शहरातील ५ हजार ५०० नागरिकांचा सहभाग

‘हर घर तिरंगा’ अभियानास माळेगाव बु. येथे उर्त्स्फूत प्रतिसाद-मुख्याधिकारी बालाजी लोंढे
शहरातील ५ हजार ५०० नागरिकांचा सहभाग
बारामती वार्तापत्र
‘हर घर तिरंगा’ अभियानात माळेगाव बु. शहरात विविध देशभक्तीपर, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व आदी विषयावर आयोजित जनजागृतीपर उपक्रमास उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला असून शहरातील ५ हजार ५०० नागरिकांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली.
हर घर तिरंगा, घरघर स्वच्छता स्पर्धा आणि अभियानांतर्गत ७ ऑगस्ट रोजी माळेगाव बु. नगरपंचायत, माळेगाव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपक्रमाविषयी चित्रफितीद्वारे माहिती देणारे संदेश समाज माध्यमावर संदेश प्रसारित करण्यात आले. ८ ऑगस्ट रोजी स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियानाबाबत जिल्हा परिषद शाळा क्र. 1 (मुलांची) येथे विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळेतील झाडांना राखी बांधून “झाडांचे रक्षाबंधन”साजरे केले.
अभियानाबाबत विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा, राखी स्पर्धा घेण्यात आली. उपक्रमात सुमारे १०० हून जास्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबरोबर स्वच्छतेचे महत्त्व रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यानगर परिसरात ९ ऑगस्ट रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिकचा वापर टाळणे व घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूल व माळेगाव बु. नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट रोजी आयोजित तिरंगा फेरीत एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. फेरीत नीरा–बारामती रस्त्यावर अपघात कमी करण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालविण्याविषयी माहिती देण्यासोबतच त्यांना सुरक्षा राखी बांधून वाहतुक सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
श्रीमंत शंभूसिंह महाराज विद्यालय, माळेगाव बु. नगरपंचायत व सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव बु. यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ऑगस्ट रोजी आयोजित तिरंगा प्रभात फेरीत ८०० हून अधिक विद्यार्थी सहभाग घेतला. श्रीमंत शंभूसिंह महाराज विद्यालय येथून फेरीची सुरुवात करण्यात आली, पुढे ती नीरा–बारामती रस्ता, पोलीस स्टेशन परिसर आणि माळेगाव रहिवासी भाग-विद्यालय येथे समारोप करण्यात आला.
माळेगाव बु. नगरपंचायत व सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव बु. यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाळांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करुन देशभक्ती, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्वबाबत सामान्यज्ञान चाचणी घेण्यात आली. यामध्ये सूमारे १ हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
माळेगाव बु. नगरपंचायत व शारदाबाई पवार कनिष्ठ महाविद्यालय, शिवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिरंगा रॅलीत २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सर्व उपक्रमांमध्ये नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पोलीस प्रशासन, विद्यार्थी, नागरिक, महिला बचत गट, विविध संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धन जनजागृती होण्यास मदत होईल, असेही श्री.लोंढे म्हणाले.