हसन मुश्रीफ संतापले, म्हणाले..ग्रामपंचायत निवडणुकीची ‘ही’ पद्धत लोकशाहीला घातक
ही पद्धत लोकशाहीला घातक अत्यंत घातक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आपण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहणार
हसन मुश्रीफ संतापले, म्हणाले..ग्रामपंचायत निवडणुकीची ‘ही’ पद्धत लोकशाहीला घातक
ही पद्धत लोकशाहीला घातक अत्यंत घातक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आपण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहणार
मुंबई, बारामती वार्तापत्र
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आदर्श मागणी होत आहे. पण, सरपंचपदासाठी कोट्यवधींचे लिलाव (Bid) होत आहे. या पद्धतीवर राज्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला आहे.
ज्या ग्रामपंचायती जाहीर लिलाव करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असतील तर त्याबाबत निवडणूक आयोगानं गुन्हे दाखल करावं, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, ही पद्धत लोकशाहीला घातक अत्यंत घातक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आपण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या 30 नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यात सर्व्हर जाम झाल्यानं जात पडताळणी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. मात्र, असं असताना राज्यात सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची बोली लागल्याचा प्रकार समोर आले आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला आहे. लिलाव करून सरपंचाची बिनविरोध निवड करणे, ही पद्धत लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी आपण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार करणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, 15 जानेवारी 2021 रोजी राज्यात ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. या अनुषंगानं जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या जास्त आहे. त्यात ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला (सर्व्हर डाऊन) आहे. यामुळे जात पडताळणी अर्जसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
आज (29 डिसेंबर) व उद्या (30 डिसेंबर) या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत.
अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आदेश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत. सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी व आवश्यकतेनुसार पोलीस विभागास संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता आवश्यकतेनुसार अर्ज स्वीकारण्याचा टेबल आणि खिडकी वाढणवण्यात यावी. कार्यालय पूर्ण वेळ तसेच सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत दोन्ही दिवशी कार्यालय सुरू ठेवावेत. ज्या अर्जदारानं ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दिलेले आहेत.