हाथरस येथील घटनेचा रिपाई महिला आघाडीच्यावतीने निषेध…..
सदरचे निवेदन शासनाला सादर करू अशी माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.

हाथरस येथील घटनेचा रिपाई महिला आघाडीच्यावतीने निषेध…..
सदरचे निवेदन शासनाला सादर करू अशी माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.
बारामती वार्तापत्र
हाथरस उत्तर प्रदेश या ठिकाणच्या दलित महिलेवर बलात्कार करून अमानुष खेळ करत निर्घुन हत्या करणाऱ्या व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नराधम आरोपींना जलद गती कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई सह फाशीची शिक्षा देण्यात यावी या विषयाचं निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बारामती शहर महिला आघाडी यांच्यावतीने बारामती शहर पोलीसला लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष रत्नप्रभा साबळे व शहराध्यक्ष पुनम घाडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने सदरील निवेदन पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील यांना देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा सचिव सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विजयराव डॅडी सोनवणे, शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, तालुका सरचिटणीस संजय वाघमारे, शहर संपर्क प्रमुख निलेश जाधव, शहर उपाध्यक्ष रोहित सोनवणे, महिला आघाडी उपाध्यक्ष रजनी साळवे, उत्कर्ष कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात या संबंधी तीव्र आंदोलने होत आहे याचाच एक भाग म्हणून हे सदर निवेदन देण्यात आले. पीडित कुटुंबीयांना तात्काळ संरक्षण देण्यात यावे व त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. सदरील घटना निंदनीय आहे त्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. सदरचे निवेदन शासनाला सादर करू अशी माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.