“हा बघा पठ्ठ्या, तू शूटिंग करतोय आणि मास्क काढून ठेवलाय म्हणत कॅमेरामनवर अजितदादा भडकले
अजित पवारांनी त्यांच्या शब्दात टोलेबाजी केली.

“हा बघा पठ्ठ्या, तू शूटिंग करतोय आणि मास्क काढून ठेवलाय म्हणत कॅमेरामनवर अजितदादा भडकले
अजित पवारांनी त्यांच्या शब्दात टोलेबाजी केली.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामाने जसे ओळखले जातात, तसेच ते त्यांच्या रोखठोक स्वभावानेही ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज बारामतीतील एका कार्यक्रमात दिसून आला. अद्याप कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नियमित मास्क लावण्याबरोबरच कोरोनाच्या इतर नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. असे असतानाही अनेक नागरिक विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यक्रमात विना मास्क उपस्थित असलेल्या एक कॅमेरामन कोरोना नियमांच महत्त्व सांगून चांगलीच कान उघाडणी केली.
कोरोनाचे संकट अद्याप दूर झालेले नाही. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवले पाहिजे. स्वतःबरोबरच कुटुंबाला सांभाळले पाहिजे.मास्क लावले पाहिजे.असे सांगत असतानाच विना मास्क कार्यक्रमाचे शूटिंग करत असणाऱ्या एक कॅमेरामन उपमुख्यमंत्री अजित पवार भर सभेत म्हणाले की, बघा या पठ्ठ्याने तर मास्कच काढून टाकला.. शूटिंग घेतोय.. मास्क लावलं नाही.. आता सांगू का पोलिसांना उचलायला… अशी कानउघडणी करून पवार म्हणाले की, पुन्हा म्हणाल दादा लय कडक आहे. तुझ्या मास्क काढल्यामुळे तुझ्या शेजारच्याला कोरोना होईल.. आम्ही काही आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही. समाजाचे हित साधण्यासाठी हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे असे पवार म्हणाले….