बारामतीचं शारदा प्रांगण झालं चिखलमय; विद्यार्थ्यांनी खेळायचं कुठं..?
शाळेच्या मैदानाचा प्रश्न!

बारामतीचं शारदा प्रांगण झालं चिखलमय; विद्यार्थ्यांनी खेळायचं कुठं..
शाळेच्या मैदानाचा प्रश्न!
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषद शाळा क्र. 5 व 7 च्या आवारातील शारदा प्रांगण मैदानाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. मैदानात पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे मुलांना खेळता येत नाही तसेच परिसर चिखलमय झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी नगरपालिकेकडे निवेदन सादर केले आहे. मैदानावर तातडीने मुरूम टाकून ते समतल करणे व पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निकाळजे म्हणाले की, “विद्यार्थ्यांना सुरक्षित व सक्षम मैदान उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करून मुलांना चांगल्या सोयीसुविधा द्याव्यात.”
📌 विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनीही केली आहे.
✊ मुलांच्या खेळासाठी सुरक्षित मैदान हीच वंचित बहुजन युवा आघाडीची ठाम मागणी आहे.