ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी – प्रवीण दरेकर
इंदापूर येथील पदवीधर शिक्षक मतदार मेळाव्यात केले वक्तव्य
ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी – प्रवीण दरेकर
इंदापूर येथील पदवीधर शिक्षक मतदार मेळाव्यात केले वक्तव्य
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
आज दि.२० रोजी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या शाहीर अमर शेख सभागृहात पदवीधर व शिक्षक मतदार मेळाव्याचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले होते.
या मेळाव्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणारे महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली तसेच यावेळी बोलताना दरेकर यांनी पुणे विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार हे जिंकून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल ही काळया दगडावरची रेष आहे. तो पायगून या दोन्ही उमेदवारांचा असल्याचा मला ठाम विश्वास आहे असे मत व्यक्त केले. तसेच केवळ जितेंद्र पवार किंवा संग्राम देशमुख आमदार बनणार एवढ्यापुरती ही निवडणूक सीमित नसून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भविष्याच्या दृष्टीने ही निवडणूक दिशा ठरवणारी असल्याचा गौप्यस्फोट यावेळी बोलताना केला.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,दौंडचे आमदार राहुल कुल, तानाजी थोरात, सुभाष माने, अविनाश मोटे आणि भारतीय जनता पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक झालेली आहे, त्यानुसारच इंदापूर तालुक्यातुन संग्रामसिंह देशमुख यांना मोठे मताधिक्य दिले जाईल,अशी ग्वाही पाटील यांनी दिली.तसेच इंदापूर तालुक्यातून संग्रामसिंह देशमुख व जितेंद्र पवार यांना जास्तीत जास्त मतदान घडवून आणणेसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.