माळेगाव बु

हेल्मेट असूनही मृत्यूने गाठले,नवविवाहित तरुणाचा करुण अंत,बाईक झाडावर आदळली,बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द मध्ये एका दुर्घटनेने

संसार फुलण्याआधीच कोमेजल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेल्मेट असूनही मृत्यूने गाठले,नवविवाहित तरुणाचा करुण अंत,बाईक झाडावर आदळली,बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द मध्ये एका दुर्घटनेने

संसार फुलण्याआधीच कोमेजल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बारामती वार्तापत्र 

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पुण्यातील 24 वर्षीय तरुणाचा बाईक अपघातात मृत्यू झाला.

बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द परिसरात घडलेल्या एका दुर्घटनेने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. संसार फुलण्याआधीच कोमेजल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अवघ्या 24 वर्षांच्या विशाल जिवक सरोदे, रा. शिवनगर, माळेगाव बु., ता. बारामती, या विवाहित तरुणाला दुचाकी झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात प्राण गमवावे लागले. हेल्मेट घातले असतानाही डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

कसा झाला अपघात?

ही दुर्घटना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिरवली रोडवर माळेगाव खुर्द येथे घडली. विशाल व्यवसायाने औषध कंपनीत सेल्समन म्हणून कार्यरत होता. रोजप्रमाणे सकाळी आपल्या यामाहा कंपनीच्या दुचाकीवर (MH 42 BQ 1006) कामावर जाण्यासाठी तो घरून निघाला होता.

काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्यावरील झाडावर जाऊन आदळली. धडकेचा जोर एवढा जबरदस्त होता, की हेल्मेट असूनही विशालच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने मदत केली. या काळात १०८ क्रमांकावर आपत्कालीन सेवेला संपर्क करण्याचे अनेक प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली. त्यामुळे विशालला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास काहीसा विलंब झाला, आणि रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास माळेगाव पोलिस ठाण्याचे हवालदार अमर थोरात करत आहेत.

सहा महिन्यांपूर्वीच विवाह

विशाल हा अत्यंत प्रेमळ आणि शांत स्वभावाचा तरुण होता. केवळ सहा महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. आयुष्यात नवी स्वप्नं पाहण्याआधीच झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या पत्नीसह आई-वडिलांवर आणि भावावर शोककळा पसरली आहे. माळेगाव परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button