हॉटेल्स रेस्टॉरंट्स रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेसह सुरु , मात्र नियम काय ?
सिनेमागृहे, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार
हॉटेल्स रेस्टॉरंट्स रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेसह सुरु, मात्र नियम काय ?
सिनेमागृहे, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार
बारामती वार्तापत्र
राज्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिलीकरणाविषयी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्स रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात आली असली तरी त्यासाठी सरकारने अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.
रेस्टॉरंट्स सुरु, मात्र नियम काय ?
रेस्टॉरंट्स सुरु करायचे असतील तर काय आणि कोणती काळजी घेतली गेली पाहिजे याबद्दल राजेश टोपे यांनी सविस्तर सांगितलं आहे. “जे लोक जेवणासाठी आलेले असतील त्यांना वेटिंग पिरयडमध्ये मास्क घालणे बंधनकारक असेल. पूर्ण उपहारगृह सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. वेटर्सनेसुद्धा मास्क वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था ही सोशल डिस्टन्सिंगचा नियम लक्षात घेऊनच केलेली असावी. सर्व कर्मचारी तसेच मॅनेजमेंटने कोरोना लसीचा डबल डोस घेतलेला असणे गरजेचे आहे. या अटीशर्तीची पूर्तता केली असेल तरच रेस्टॉरंट्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.