होमिओपॅथी उपयुक्त पण शास्त्रोक्त टेस्टीमोनियल्स सर्वांसमोर येणे गरजेचे : हृदयरोग तज्ञ डॉ.अविनाश पाणबुडे
ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ञ डॉ. संदेश शरद शहा यांना घोषित

होमिओपॅथी उपयुक्त पण शास्त्रोक्त टेस्टीमोनियल्स सर्वांसमोर येणे गरजेचे : हृदयरोग तज्ञ डॉ.अविनाश पाणबुडे
ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ञ डॉ. संदेश शरद शहा यांना घोषित
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर तालुका आयएमए,आयुर्वेदिक व होमिओपॅथिक असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचा राज्य स्तरीय डॉ. सॅम्युएल हॅनेमान जीवन गौरव पुरस्कार सन २०२५ – २६ इंदापूर येथील ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ञ डॉ. संदेश शरद शहा यांना घोषित झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या पत्नी डॉ. राधिका शहा यांचा इंदापूर आयएमए चे माजी अध्यक्ष, हृदयरोग तज्ञ डॉ. अविनाश पाणबुडे यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रुग्णालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. पाणबुडे म्हणाले, होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनेमान हे आधुनिक चिकित्सा पद्धतीचे एम. डी डॉक्टर होते. त्याकाळी रुग्णांना व्यवस्थित गुण येत नसल्यामुळे त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय बंद करून भाषांतराचे काम सुरू केले. त्यांनी एक प्रकारच्या बाभूळ च्या सालीवर मलेरियाच्या लक्षणा संदर्भात तसेच याचा मलेरियाचे रुग्ण बरे करण्यासाठी गोल्डन प्रयोग करून त्याची स्वतः तसेच इतरांवर पडताळणी केली. त्यानंतर त्यांनी हा यशस्वी प्रयोग वैद्यकीय विश्वासमोर आणला. त्यामुळे त्यांना होमिओपॅथीचे जनक म्हणून ओळखले जाते. होमिओपॅथीस प्लेसिबो थेरापी म्हटले जाते मात्र होमिओपॅथीने विविध व्याधी बरे होत असल्याने याचे शास्त्रोक्त पुरावे जगासमोर येणे ही काळाची गरज आहे. डॉ. संदेश शहा यांना हा पुरस्कार मिळाल्याने इंदापूर तालुक्याचा नावलौकिक उंचावला असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
यावेळी सत्कारमूर्ती डॉ. संदेश शहा म्हणाले, होमिओपॅथिक औषधांमुळे मूतखडे, पित्ताशयाचे खडे, फॉलोपियन ट्यूब ब्लॉकेज, चामखीळ, कुरूपे, अपेंडिक्स, थायरॉईड गाठ, विविध प्रकाराच्या गाठी आदी विविध आजारांच्या हजारो शस्त्रक्रिया टळल्या आहेत. त्यामुळे मला मिळालेला हा पुरस्कार माझे सर्व प्राचार्य, शिक्षक, सहकारी डॉक्टर मित्र, पत्नी, सर्व रुग्ण तसेच माझे मोठे भाऊ, जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा यांना अर्पण करतो.
यावेळी इंदापूर आयएम ए चे अध्यक्ष डॉ. अनिल शिर्के, डॉ. अमर फुले यांनी भाषण केले.प्रास्ताविक डॉ. अरविंद अरकिले यांनी तर सूत्र संचलन डॉ. सूर्यकांत बनसुडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. आशिष दोभाडा यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद खाडे, डॉ. नामदेव गार्डे, डॉ. विनोद राजापुरे, डॉ. समीर मगर, डॉ. अर्जुन नरुटे, डॉ. सुरज काळे, डॉ. निलेश कुंभार, डॉ. सचिन बाबर, डॉ. मधुकर राऊत, डॉ. रणजीत कोरटकर, डॉ. उदय फडतरे, डॉ. मनोज शिंदे, मेट्रन वर्षा देशमुख उपस्थित होते.
डॉ. सॅम्युएल हॅनेमान जीवन गौरव पुरस्कार डॉ. संदेश शहा यांना मिळाल्याबद्दल त्यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहा ग्लोबल स्कूल चे विश्वस्त मुकुंद शहा, भरत शहा, रोटरी ३१३१ चे डी जी शीतल शहा, वसंतराव मालुंजकर, आझाद पटेल, मोरेश्वर कोकरे, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर, तुषार रंजनकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तुकाराम जाधव, जेष्ठ वकील आत्माराम चौगुले, गजानन शिंदे, पत्रकार संतोष आटोळे, सुरेश जकाते, महेश स्वामी, धनंजय कळमकर, कैलास पवार आदींनी सत्कार केला.