स्थानिक
ह.मोहम्मद पैगंबर (स.) जयंतीनिमित्त स्नेहभोजनाचा घेतला आनंद!
इस्लाम विषयी माहिती पुस्तिकेचे व सुहासिक अत्तर बॉटलचे वाटप

ह.मोहम्मद पैगंबर (स.) जयंतीनिमित्त स्नेहभोजनाचा घेतला आनंद!
इस्लाम विषयी माहिती पुस्तिकेचे व सुहासिक अत्तर बॉटलचे वाटप
बारामती वार्तापत्र
ह.मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या 1 हजार 500 व्या जयंतीनिमित्त एकता ग्रुप व आलताफ सय्यद मित्र परिवार यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत सहभागी हजारो मुस्लीम बांधवांनी या भोजनाचा आनंद घेतला. यावेळी उपस्थित बांधवांना अलअजिम परफ्युम्स्, पुणे यांच्या सौजन्याने इस्लाम विषयी माहिती पुस्तिकेचे व सुहासिक अत्तर बॉटलचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, शहर युवकाध्यक्ष अविनाश बांदल, दूध संघाचे माजी चेअरमन सतिश तावरे, माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, पत्रकार राजेंद्र गलांडे, प्रशांत ननवरे, अमोल तोरणे, प्रमोद ठोंबरे, उमेश दुबे, विराज शिंदे, तानाजी पाथरकर, दिलीप ढवाण, इक्बाल डीन, जुजरशेठ कायमखानी, निलेश इंगुले, पार्थ गालिंदे, बापू शेंडगे, आदित्य हिंगणे, प्रविण गालिंदे, साधु बल्लाळ इ. तसेच समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा व समाज बांधवांचे आभार आलताफ सय्यद यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परवेज सय्यद, हाजी कमरूद्दीन सय्यद, सुभान कुरेशी, आसिफ झारी, सलीम तांबोळी, हारूण (राजु) शेख, आकलाज सय्यद, हाजी वसीम कुरेशी, नजीर आतार, हाजी रशीद बागवान, तैनुर शेख, आजीम आतार, मोहसीन मणेर, इम्रान सादिक मोमीन, इम्रान सलीम मोमीन, इरफान झारी, समीर झारी, इम्तियाज तांबोळी, समीर तांबोळी, जहीर पठाण, आसिफ शेख, आसिफ बागवान (वॉचमेकर), मोहसीन बागवान, समीर शेख, तबरेज सय्यद, शाहीद सय्यद, रिजवान सय्यद, इम्रान सय्यद, आलताफ शेख, आफ्रोज मुजावर, इक्बाल सय्यद, युसूफ सय्यद, बाबूभाई शेख, जुबेर शेख, मेहबुब सय्यद, अमिर शेख, फिरोज आ.शेख, गुफरान कुरेशी, शाहीद कुरेशी, मुजाहीद शेख, शब्बीरभाई सय्यद, शोएब तांबोळी, जलील तांबोळी, तन्वीर इनामदार, रियाज बागवान, राजु तांबोळी, जावेद बागवान, इम्रान तांबोळी, साहील सय्यद, नवाज सय्यद, जाकीर शेख, शकील बागवान, मकदूम बागवान, नईम बागवान, तोहसिब शेख, मोहसीन शेख, शाहरूख तांबोळी, आरबाज तांबोळी, आबुभाई शेख इ. मोलाचे सहकार्य केले.