स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार : स्वप्नील सावंत
इंदापूर तालुक्यातील प्रमुख काँगेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार : स्वप्नील सावंत
इंदापूर तालुक्यातील प्रमुख काँगेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी (दि.१३) पार पडली.या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असा निर्णय झाल्याचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षवाढीसाठी सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय झाला आहे.या निवडणुकांमध्ये समाजामध्ये काम करणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना पक्ष संधी देईल, त्याचबरोबर होतकरू युवकांचा देखील पक्ष विचार करेल.या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते हे इंदापूर मध्ये येणार आहेत. आज पर्यंत काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांसाठी केलेल्या कामाच्या जोरावरती लोकांच्या पुढे जाऊ.सध्यस्थितीत देशाला काँग्रेसची गरज आहे असे मत इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी यावेळी मांडले .
सदरील बैठक तालुकाध्यक्ष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीसाठी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर,उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर,जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जाकीरभाई काझी, इंदापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चमनभाई बागवान, किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष संतोष होगले, महादेव लोंढे, निवास शेळके , भगवान पासगे, श्रीनिवास पाटील, आकाश पवार, युवराज गायकवाड, शिवाजी आहेर आदी उपस्थित होते.