१ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज लुबाडल्या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल
युवकांचा दारूच्या नशेतील प्रताप
१ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज लुबाडल्या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल
युवकांचा दारूच्या नशेतील प्रताप
बारामती वार्तापत्र
शेताच्या कामासाठी आणलेली रोख रक्कम १ लाख १७ हजार रुपयांसह मोबाईल व सोन्याच्या अंगठ्या असा १ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज लुबाडल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२७) इंदापूर शहराजवळच्या गलांडवाडी नं.२ येथे घडला.या प्रकरणी चौघा जणांविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दारुच्या प्रतापाने हे सारे प्रकरण घडल्याचे समोर येत आहे.
गणेश विलास शिंदे,अतुल संजय शिंदे (दोघे रा. सावतामाळीनगर, इंदापूर),शिवाजी ज्ञानदेव बोबडे, व लोखंडे (पूर्ण नाव माहिती नाही.दोघे रा.गलांडवाडी नं.२) अशी आरोपींची नावे आहेत.संजय लक्ष्मण गदादे (वय ४४ वर्षे, रा.गलांडवाडी नं.२) असे फिर्यादीचे नाव आहे.
या बाबत सविस्तर हकीकत अशी की,फिर्यादी संजय गदादे यास शेतीच्या कामासाठी पैसे लागणार होते.त्यासाठी त्याने शुक्रवारी इंदापूरातील युनियन बँकेतील त्याच्या खात्यामधून ४० हजार रुपये मुथुट फायनान्समधून ४० हजार रुपये व लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात स्वतःची सोन्याची अंगठी मोडून तिचे ४० हजार रुपये असे एकूण १ लाख २० हजार रुपये जमा केले होते.ही बाब आरोपी गणेश शिंदे व अतुल शिंदे यांना माहिती होती.
त्यादिवशी ते तिघे इंदापूरातील हॉटेल ग्रीनपार्क येथे गेले होते.तेथे फिर्यादीने दारु प्यायली.फिर्यादीच्या घरी गेल्यानंतर या दोघांनी फिर्यादीला उरलेली दारु पिण्यास भाग पाडले.फिर्यादीच्या बुलेटची सर्व्हिसिंग करुन आणण्याच्या बहाण्याने त्याच्या कडून दोन हजार रुपये घेतले.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या शेजारी राहणारे शिवाजी बोबडे व लोखंडे हे आरोपी फिर्यादीच्या घरी आले. फिर्यादीबरोबर दारु पिताना फिर्यादीने त्यांना पैसे आणल्याचे सांगितले होते.ते दोघे निघून गेल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या अतुल शिंदे व सागर शिंदे बुलेट घेवून फिर्यादीच्या घरी आले.पैश्याबद्दल विचारणा केली.रात्री अकरा वाजता परत जाताना त्यांनी घरातील लाईट बंद केली.विचारल्यानंतर लाईट गेल्याचे त्यांनी फिर्यादीस सांगितले.तुम्ही झोपा आता आम्ही जाताना दरवाजा लावून जातो,असे त्यांनी सांगितले.दरम्यानच्या काळात फिर्यादीने सर्व रक्कम कपाटात ठेवून चावी कपाटालाच लावून ठेवली होती.
दारुच्या नशेत झोपी गेलेल्या फिर्यादीला मध्यरात्री अचानक जाग आली.त्यावेळी घराचा दरवाजा उघडा असल्याचे व घराबाहेरच्या सर्व लाईट सुरु असताना घरातील लाईट बंद असल्याचे त्याला आढळून आले.
फिर्यादीने घरातील लाईट सुरु केल्यानंतर कपाटातील रक्कम, सोन्याच्या सहा अंगठ्या, मोबाईल मिळुन आला नाही.त्यानंतर त्याने काल इंदापूर पोलीस ठाण्यात जावून वरील चौघांविरुध्द फिर्याद दिली. हवालदार शंकरराव वाघमारे अधिक तपास करत आहेत.