स्थानिक

२२ फेब्रुवारीला धनगर समाजाचा मंत्रालयावर महामोर्चा… आणि बारामतीत २८ फेब्रुवारीला धरणे आंदोलन..

२८ फेब्रुवारीला महाराष्ट्र विधानसभेचे यावर्षाचे अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे,

२२ फेब्रुवारीला धनगर समाजाचा मंत्रालयावर महामोर्चा… आणि बारामतीत २८ फेब्रुवारीला धरणे आंदोलन...

२८ फेब्रुवारीला महाराष्ट्र विधानसभेचे यावर्षाचे अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे,

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या दोन कोटींच्यावर आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जातींमध्ये (ST) मध्ये अमलबजावणीसाठी अनेक वर्षे लढा देत आहे परंतु सरकारचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जातीचे (ST) आरक्षण दिले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. आरक्षण नसल्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय विकास खुंटला आहे. त्यामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये दोन कोटी धनगर समाज आहे. हेच कदाचित महाराष्ट्र सरकारला कदाचित माहीत नसावे, याची जाणीव करून देण्यासाठी” यशवंत ब्रिगेड” संघटनेच्या च्या वतीने धनगर समाजाचा महामोर्चा २२ फेब्रुवारी २०२२ रोजी मंत्रालय मुबई येथे काढण्यात येणार आहे. तसेच २८ फेब्रुवारीला बारामती येथे धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा यशवंत ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर यांनी जाहीर केले आहे .

२८ फेब्रुवारीला महाराष्ट्र विधानसभेचे यावर्षाचे अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये धनगर समाजाच्या मागण्यांचा आपण गांभीर्य पूर्वक विचार करावा अशी मागणी केली आहे. धनगर समाजातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे आव्हान देखील करण्यात आले आहे. महामोर्चामध्ये यशवंत ब्रिगेड, यशवंत छावा संघटना, यशवंत सेना, अहिल्या ब्रिगेड, यशवंत फाउंडेशन, व्हीजे – एनटी समता परिषद, धनगर समाज क्रांती मोर्चा इत्यादी संघटना सहभागी होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram