२७ वी ओपन स्टेट तायकांदो स्पर्धेत शाहू हायस्कूल चे यश
शाळेच्या वतीने या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

२७ वी ओपन स्टेट तायकांदो स्पर्धेत शाहू हायस्कूल चे यश
शाळेच्या वतीने या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती येथील इयत्ता पाचवी मधील श्रीशैल नालवर या विद्यार्थ्याने ओपन स्टेट तायकांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून सोहेल खान याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
शाळेच्या वतीने या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
माननीय मुख्याध्यापक श्री पवार बी एन सर यांनी श्रीशैल यास गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले तसेच माननीय पर्यवेक्षक श्री साळुंके सर यांनी सोहेल खान यास सिल्व्हर मेडल आणि प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी यासाठी माननीय मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
क्रीडा शिक्षक श्री जाधव एस एम सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व खेळांविषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिक्षक प्रतिनिधी श्री तावरे जी आर यांनी ओपन स्टेट तायकांदो स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी विद्यार्थी पालक यांच्याकडून अभिनंदन केले.