३२ व्या जूनियर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अनेकान्त स्कूलची दमदार कामगिरी..
महाराष्ट्र बेसबॉल प्रमुख प्रशिक्षिका पदी निवड
३२ व्या जूनियर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अनेकान्त स्कूलची दमदार कामगिरी..
महाराष्ट्र बेसबॉल प्रमुख प्रशिक्षिका पदी निवड
बारामती वार्तापत्र
०२ ऑक्टोबर ते ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी पंजाब येथे झालेल्या ३२ व्या जूनियर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने कांस्य पदक प्राप्त केले. पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड १४-०४, दुसरा सामना महाराष्ट्र विरुद्ध आंध्र प्रदेश ११-०० उपांत्य पूर्व सामना महाराष्ट्र विरुद्ध मध्य प्रदेश १०-००, उपांत्य सामना महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली मध्ये चुरशीचा झाला.
या सामन्यात महाराष्ट्राला हार मानावी लागली. कांस्य पदकासाठी महाराष्ट्राला हरियाणा सोबत सामना खेळावा लागला ०८-०७ ने कांस्य पदक आपल्या नावावर केला.
महाराष्ट्र संघात गार्गी गोडसे आणि अदिती परकाळे ह्या दोन्ही खेळाडू अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूल बारामतीच्या आहेत.
सदर स्पर्धेसाठी अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या क्रीडा शिक्षिका रेखा धनगर यांची महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनच्या वतीने मुलींच्या संघाच्या प्रमुख प्रशिक्षिका पदी निवड करण्यात आली.
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव तसेच शाळा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रवदन शहा मुंबईकर त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती व स्कूलच्या प्राचार्या यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.