मुंबई

९५ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या १५ फेब्रुवारीला

रिक्तपदांसाठी देखील प्रारूप मतदार याद्या

९५ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या १५ फेब्रुवारीला

रिक्तपदांसाठी देखील प्रारूप मतदार याद्या

मुंबई, बारामती वार्तापत्र 

विविध जिल्ह्यांमधील ९५ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध ३१ नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील ३५ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 15 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 1 मार्च 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: ठाणे- अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, मुरबाड, शहापूर, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, रत्नागिरी- मंडणगड, सिंधुदुर्ग- कसई- दोडामार्ग, वाभवे- वैभववाडी, पुणे- राजगुरूनगर, चाकण, नाशिक- चांदवड, निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, जळगाव- भडगाव, वरणगाव अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, जामखेड, शेवगाव, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, परभणी- पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर- अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, नांदेड- भोकर, हिमायतनगर, नायगाव, हिंगोली- सेनगाव, औंढा- नागनाथ, अमरावती- भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव- खंडेश्वर, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, झरी, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, वाशीम- मानोरा, नागपूर- मोवाड, वाडी, हिंगणा, कुही, भिवापूर, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, चंद्रपूर- चिमूर, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram