ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत गरीब कल्याण संमेलन संपन्न
तीन कोटी लोकांना पक्की घरे मिळाली आहेत.
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत गरीब कल्याण संमेलन संपन्न
तीन कोटी लोकांना पक्की घरे मिळाली आहेत.
बारामती वार्तापत्र
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्स वर्षानिमित्त 16 केंद्र शासनाच्या गरीब कल्याण योजना च्या लाभार्थी बरोबर मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा संवाद शिमला हिमाचल प्रदेश येथून देशभरात ऑनलाईन प्रणाली द्वारे केला या सर्व योजना गरिबाच्या कल्याणसाठी असल्यामुळे गरीब कल्याण संमेलन असे आयोजन करण्यात आले होते यावेळी 10 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अकरावा हप्ता डिजिटल प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना खात्यामध्ये पाठविला.
शिमला हिमाचल प्रदेश येथून हा कार्यक्रम सर्व देशभरातील कृषी विज्ञान केंद्र व इतर सरकारी कार्यालयातून दाखवला जात होता .त्यावेळी मा नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार म्हणाले की देशभरात 130 कोटी जनतेसाठी काम करत असताना विविध योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट अनुदान जमा होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार व अपराध त्यावर कंट्रोल आले आहे.
देशवासीयांना सुख शांती समृद्धी कशी राहिली त्यासाठी काम करत आहे. तीन कोटी लोकांना पक्की घरे मिळाली आहेत 50 कोटी लोकांना पाच लाखापर्यंत मुक्त इलाज इन्शुरन्स च्या माध्यमातून होत आहे .दोनशे कोटी कोरोनचे डोस दिले आहेत. आपल्या देशातून निर्यातीचे रेकॉर्ड झालेले आहे. आपल्या देशाची जगातील तिसरी स्टार्टअप इकोसिस्टीम झाली आहे .नवे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच जगातील सर्वश्रेष्ठ डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बनविण्याचे प्रयत्न सुरू आहे सर्वत्र रोडचे मोठ्या प्रमाणात जाळे होत आहे.
या कार्यक्रमास सुरवातीला बारामती लोकसभा खासदार सौ. सुप्रिया ताई सुळे या शारदा नगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात उपस्थित शेतकऱ्यांशी ऑनलाईन प्रणालीद्वारे संवाद साधला. आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून त्या म्हणाल्या राज्य सरकारच्या विविध योजना आहेत केंद्राच्या योजना राज्यामध्ये राबविण्यासाठी तसेच राज्याच्या योजना मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मा.बाळासाहेब थोरात ,कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहेत.
त्यामध्ये शेततळे, प्लास्टिक मल्चिंग, हरितग्रह, फळबाग लागवड, यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा, ठिबक सिंचन व तुषार सिंचन, कांदा चाळ, ड्रॅगन फ्रुट लागवड रोपवाटिका , प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ,शेतकरी उत्पादक कंपनी इ. चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे.या वेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे ,तहसीलदार श्री. विजय पाटील ,उपविभागीय कृषी अधिकारी श्री. वैभव तांबे साहेब,तालुका कृषी अधिकारी बांदल मॅडम, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, बारामती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोकडे साहेब, माळेगाव नगरपंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सौ. स्मिता काळे होत्या. त्या पुढे म्हणाल्या पूर्वी खपली गहू, तांदूळ, बाजरी ,ज्वारी ,मोठ्या प्रमाणात आहारामध्ये असायच्या मधल्या काळात ते कमी झाले आता पुन्हा लोक त्याचे सेवन करत आहे .
कोरोना काळात संपूर्ण जग ठप्प झाले होते पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या भरीव उत्पन्नामुळे आपल्याला अन्न धान्य कमी पडू दिले नाही. कृषिक कृषी प्रदर्शन सारखा उपक्रम के.व्ही.के. बारामती राबवते त्यामध्ये लाखो लोक येतात व नव नव तंत्रज्ञान पाहत आहे. इंदापूर येथील शेतीमाल, पुरंदर येथील अंजीर जगभरात जात आहे. उपविभागीय अधिकारी श्री. कांबळे साहेब म्हणाले प्रधानमंत्री आवास योजना ही बारामतीमध्ये राबवली जात आहे.
तसेच प्रधानमंत्री उज्वल योजना, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत अभियान, जल जीवन अभियान, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना, आयुष्मान भारत जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत आरोग्य योजना. असे अनेक योजनांचा लाभ देश भारतील लोक घेत आहेत.
निमगाव केतकीचे शेतकरी श्री.संतोष राऊत यांनी भाजीपाला उत्पादन बाबत माहिती दिली. विषय विशेषज्ञ श्री. यशवंत जगदाळे यांनी परसबागेतील भाजीपाला लागवड , श्री. संतोष करंजे यांनी खरीप पीक बाबत मार्गदर्शन केले. डॉ. जोशी यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे लाभार्थी जसे पंचायत राज, नगरपालिका, कृषी विभाग ,आरोग्य विभाग व लीड बँक कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते.डॉ. रतन जाधव यांनी सूत्रसंचालन केले व श्री संतोष गोडसे यांनी आभार मानले.