इमरान खानने पसरले हात
इस्लामाबाद | कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असून पाकिस्तानातही परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. कोरोनामुळे पाकिस्तानातील सर्व व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानला उपासमारीपासून वाचवण्याचं आवाहन जगाला केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलयं.पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशाची अर्थव्यवस्था कोरोनासारख्या महारोगराईचा सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. जगातील बड्या संस्थांनी अशा विकसनशील देशांना मदत करण्यासाठी आणि त्यांना कर्जमाफी देण्यासाठी मोहीम सुरू करण्याची गरज असून, त्यासाठी पुढे यायला हवं, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.पाकिस्तानला लवकरच मदत केली नाही तर कोरोनाच्या आधी लोक उपासमारीने मरतील. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी विकसनशील देशांनी मदत करणवी. जेणेकरून कोरोना व्हायरसच्या आव्हानांवर आम्ही मात करू, असं आवाहनही खान यांनी केलं आहे.दरम्यान, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.