12 ते 20 सप्टेंबर दरम्यान इंदापूर तालुक्यात लॉकडाउन ची घोषणा.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.
12 ते 20 सप्टेंबर दरम्यान इंदापूर तालुक्यात लॉकडाउन ची घोषणा.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.
इंदापूर:-प्रतिनिधी
दि. 11 सप्टेंबर रात्री बारा वाजेपासून रविवार दिनांक 20 सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत इंदापूर शहर व तालुका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापारी, नागरिक व पदाधिकारी समन्वय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये दूध विक्री सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे,इमर्जन्सी मेडिकल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत, तसेच इंदापूर शहर हद्दीतील सर्व रस्ते शील करून शहरात प्रवेश बंद केला जाणार आहे.
इंदापूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भाग पूर्णपणे सात दिवस कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर शहराच्या नगराध्यक्ष अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ.प्रदीप टेंगल, गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक एकनाथ चंदनशिवे, सुहाष शेळके, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख नितीन शिंदे,व्यापारी नागरिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.