121 महिला बचतगटांना 5 कोटी

कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे : इंदापूरात कर्ज वाटप 

121 महिला बचतगटांना 5 कोटी

कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे : इंदापूरात कर्ज वाटप

इंदापूर प्रतिनिधी –

इंदापूर तालुक्यातील बचत गटांना खेळते भांडवल पंधरा हजारांवरून तीस हजार रुपये केले आहे. इंदापूर तालुक्यात 3110  महिला बचत गट आहेत. त्या माध्यमातून 31 हजार महिलांच्या हाताला आर्थिक बळ देण्याचे काम सुरु आहे. शनिवारी (दि.8) मार्च रोजी 121 महिला बचत गटांना 5 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झालेले असून मिळालेल्या कर्जातून महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे, असे आवाहन कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर पंचायत समितीच्या शंकरराव पाटील सभागृहात, इंदापूर तालुक्यातील महिला बचत गटांना, उमेद योजनेअंतर्गत भरणे यांच्या हस्ते पाच कोटी रुपयांच्या धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकासअधिकारी सचिन खुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, हनुमंत कोकाटे, माजी सरपंच विष्णू पाटील व सर्व बँकांचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. मंत्री भरणे म्हणाले की, आता राज्यशासनाने महिलांना मुख्य प्रवाहात घेतले असून, त्यामुळे राज्यात चांगला बदल होत आहे. महिलांना नाकारून किंवा डावलून चालणार नाही. अर्थसंकल्पात 60 हजार कोटींचेबजेट वाढले असून रस्त्यासाठी एकही रुपया मिळालेला नाही. लाडक्या बहिणींना लाभ दिल्यामुळे बजेटवर आर्थिक ताण आलेला आहे. तरीही इंदापूर शहरात महिलांना एक स्वतंत्र इमारत बांधून दिले जाणार आहे. अस्मिता भवनचे चांगले काम करून देणार आहे. तसेच जिल्हा परिषद गटवाईज इमारती बांधून देणार आहोत. त्यामुळे महिलांना चांगली सोय होणार आहे.

Back to top button