12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार – गृहमंत्री अनिल देशमुख
पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया, उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील
12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार – गृहमंत्री अनिल देशमुख
पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया, उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील
बारामती वार्तापत्र
राज्यातील पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेले तरुण उमेदवार यांच्यासाठी एक खुशखबर आहे. आपण बहुचर्चित ,वाट पाहत असलेल्या पोलीस भरतीची घोषणा आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल तर उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील आणि गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांच्या जाग्या जागा भरण्यात येतील असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
शासनाच्या वतीने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय झाला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने एस ईबी सी आरक्षणाला स्थगिती दिल्याने भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र आता ही भरती प्रक्रिया एस इ बी सी चे आरक्षण न ठेवता राबविणार आहेत. असं गृहविभागाने स्पष्ट केल आहे .एसीबीसी तुन अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केले जाणार आहे.
एस ई बी सी तुन अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाईल ,वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात आली असून पंधरा दिवसात सर्व कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. याबरोबरच पोलीस खात्यात गरज वाटल्यास आणखी पोलीस भरती करणार आहेत त्यामुळे ही भविष्यात या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो या निर्णयामुळे एकंदरीतच अभ्यास करणाऱ्या व भरती प्रक्रिया येत सर्व उमेदवारांना ही एक उत्तम संधी आले आहे
[11:16 am, 22/01/2021] किशोर भोईटे, सणसर: 👆✅