
14 वर्षीय शाळकरी मुलाचा रुदय विकाऱ्याच्या तीव्र झटक्याने निधन
देऊळगाव रसाळ हळहळले
बारामती वार्तापत्र
देऊळगाव रसाळ मधील इ. 8 मध्ये शिकत असलेला (वय -14) नाव – सूरज प्रल्हाद रसाळ याचे काल दी. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता रुदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो विद्या प्रतिष्ठान वसंतराव पवार विद्यालयात शिकत होता. त्याला जन्मतःच रुदयाचा त्रास होता. वडील प्रल्हाद एकनाथ रसाळ यांनी चेन्नई पर्यंत ऑपरेशनसाठी नेले होते. परंतु ऑपरेशन होत नव्हते.शेवटी काल त्याचे निधन झाले.अचानक त्याच्या जाण्याने देऊळगाव रसाळ व पंचक्रोशीतील लोकांनी हळहळ व्यक्त केली गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.
सर्वांशी प्रेमाने बोलणारा, सर्वांचा आदर करणारा, सर्वांशी मन मिळवू पणे वागणारा, आपल्या तल्लख बुद्धीने पटकन गणित सोडविणारा एक हुशार मुलगा गेल्याचे त्यांचे चुलत बंधू राहुल रमेश रसाळ यांनी बारामती वार्तापत्रशी बोलताना सांगितले.