आषाढी वारीसाठी काही अटी आणि शर्तीही घालण्यात आल्या आहेत,पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार
मागील वर्षी वारीला जे निर्बंध घालण्यात आले होते. तसेच निर्बंध आता लावण्यात आलेले नाहीत.

आषाढी वारीसाठी काही अटी आणि शर्तीही घालण्यात आल्या आहेत,पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार
मागील वर्षी वारीला जे निर्बंध घालण्यात आले होते. तसेच निर्बंध आता लावण्यात आलेले नाहीत.
बारामती वार्तापत्र
आषाढी वारीसाठी फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच वारीसाठी काही अटी आणि शर्तीही घालण्यात आल्या आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. वारीची परंपरा टिकली पाहिजेत. पण कुंभमेळ्यात जे घडलं, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी, पोलीस, प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि इतरांशी चर्चा करूनच राज्य सरकारने वारीबाबतचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली वारीची परंपरा टिकली पाहिजे. परंतु, सध्या कोरोनाचं सावटही आहे, त्यांचा विचारही केला पाहिजे. त्यामुळे वारीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीसाठी शिथिलता देण्यात आली आहे, असं पवार म्हणाले.
तर वारकऱ्यांशी चर्चा करू
मागील वर्षी वारीला जे निर्बंध घालण्यात आले होते. तसेच निर्बंध आता लावण्यात आलेले नाहीत. कुंभमेळ्यात जे घडलं तसं इथं घडू नये याची दक्षता घेणं आवश्यक आहे. वारीची परंपरा टिकली पाहिजे. त्यासाठी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे, असं ते म्हणाले. आम्ही वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर करतो. राज्याच्या आरोग्याच्या हिताकडेही लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्या लाटेचीही शक्यता आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. मात्र, वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र असतील तर त्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचना देऊन संबंधित मान्यवरांशी चर्चा करण्यास सांगू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.